Home | Maharashtra | Mumbai | Veteran actor amol palekar speech interrupted by organisers for speeking against government

मुंबईत अमोल पालेकरांचे भाषण अचानक रोखले, सरकारवर टीका करताना कार्यक्रमाच्या आयोजकांचा आक्षेप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 10, 2019, 11:43 AM IST

ही घटना नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) एका कार्यक्रमात घडली.

  • Veteran actor amol palekar speech interrupted by organisers for speeking against government

    मुंबई - ज्येष्ठ अभिनेते तसेच चित्रपट निर्माते अमोल पालेकर यांचे एका खासगी कार्यक्रमातील भाषण अचानक अडवण्यात आले. ही घटना नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) एका कार्यक्रमात घडली. मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या इनसाइड द एम्पटी बॉक्स ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. त्याच कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालेकर सरकारच्या कथित कलाकारांच्या स्वातंत्र्यविरोधी धोरणांवर टीका करत होते. परंतु, आयोजकांनी त्यांचे भाषण वारंवार रोखले.


    अमोल पालेकर यांनी त्या कार्यक्रमात नेमके काय म्हटले आणि त्यांचे भाषण कसे रोखण्यात आले याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पालेकर गॅलरीच्या मुंबई आणि बेंगळुरूतील सदस्यांशी संवाद साधताना, पालेकर म्हणाले, "येथे उपस्थित असलेल्यांपैकी अनेकांना माहिती नसेल की स्थानिक कलाकारांच्या समितीने आयोजित केलेला आणि सरकारी अधिकारी किंवा दिल्लीतील एका विशिष्ट विचारसरणीला प्रोत्साहित करून नैतिकतेचे धडे देणाऱ्यांचा हस्तक्षेप नसलेला हा शेवटचाच कार्यक्रम ठरेल. माझ्या माहितीप्रमाणे, सरकारने मुंबई आणि बेंगळुरू येथील प्रादेशिक केंद्रांच्या सल्लागार समित्या 13 नोव्हेंबर 2018 रोजी भंग केल्या आहेत." यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळेल याचा प्रयत्न आपण करत आहोत असेही ते पुढे म्हणाले.


    अमोल पालेकर यावर बोलत असताना एनजीएमएच्या मुंबई केंद्राच्या संचालक अनिता रूपावतरम यांनी त्यांना टोकले. तसेच आपण फक्त या कार्यक्रमावरच बोलावे असे त्या म्हणाल्या. त्यावर वेळीच प्रतिक्रिया देताना, आपण माझ्या भाषणावर सेन्सॉरशिप लागू करत आहात का? असा सवाल पालेकर यांनी केला. यापुढे पालेकर यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले. तसेच स्थानिक सल्लागार समित्या भंग केल्यानंतर आता कलाकारांच्या प्रदर्शन कुठल्या कलाकारांना जागा दिली जाणार याचा निर्णय दिल्ली बसलेले सांस्कृतिक मंत्रालय घेणार आहे अशी टीका त्यांनी केली. यानंतर सुद्धा पालेकर यांचे भाषण वारंवार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतरही रुपावतरम यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. पालेकर यांना आक्षेप असल्यास त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधून बोलायला हवे होते भर कार्यक्रमात त्यांनी बोलण्यास आपला आक्षेप होता असे रुपावतम यांनी स्पष्ट केले.

Trending