Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Veteran Actor Dilip Kumar Hospitalised After Chest Infection

योग्य वेळी दिलीप कुमार यांनी केले असते हे एक काम तर झाला नसता हा आजार, तुम्ही राहा अलर्ट

हेल्थ डेस्क | Update - Sep 06, 2018, 12:31 PM IST

ट्रॅजेडी किंग नावाने प्रसिद्ध असलेले अभनेता दिलीप कुमार यांना मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

 • Veteran Actor Dilip Kumar Hospitalised After Chest Infection

  ट्रॅजेडी किंग नावाने प्रसिद्ध असलेले अभनेता दिलीप कुमार यांना मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. ते 95 वर्षांचे आहेत. डॉक्टरांनुसार त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झाले. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांची तब्येत बिघडली होती. यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये किडनी इन्फेक्शनमुळे त्यांना एक आठवड्यासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहोत. नोव्हेंबर 2017 मध्ये माइल्ड निमोनिया झाला होता. या संदर्भात पीपल्स मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉक्टर सुशील शिंदे (MD मेडिसिन, MBBS) यांनी या सर्व आजारांविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.


  डॉक्टर सुशील शिंदे यांच्यानुसार, दिलीप कुमार यांची तब्येत वारंवार खराब होण्यामागे सर्वात मोठे कारण निमोनिया आहे. वाढत्या वयासोबत निमोनिया होणे सामान्य गोष्ट आहे. वयासोबतच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ लागते. यामुळे असे आजार होणे सामान्य गोष्ट आहे. डायबिटीज असलेल्या लोकांना हा प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे. यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन होते.


  या कारणामुळे होतो हा आजार
  1. रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे
  2. स्मोकिंग करणे


  का बिघडते तब्येत
  बॉडीची इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे निमोनिया होतो. यासोबतच स्मोकिंगमुळे लंग्स खराब होतात. ज्यामुळे बॉडीची रोगप्रतिकारकशक्ती आणखी कमी होते.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, फुप्फुसामध्ये इन्फेक्शनचे 4 संकेत आणि उपाय...

 • Veteran Actor Dilip Kumar Hospitalised After Chest Infection

  फुप्फुसामध्ये इन्फेक्शनचे 4 संकेत
  1. थंडी वाजवून येते तसेच 100.4F पेक्षा जास्त ताप येणे. हा फुप्फुसामध्ये इन्फेक्शनचा पहिला संकेत आहे.
  2. श्वास घेण्यास त्रास होणे. म्हणजेच तुमच्या फुप्फुसामध्ये इन्फेक्शन डेव्हलप होत आहे.
  3. अत्याधिक प्रमाणात कफ जमा होंते हा लंग्स इन्फेक्शनचा धोका आहे. काहीवेळा कफचा रंगही बदलतो.
  4. छातीमध्ये एका बाजूला त्रास होते, श्वास घेताना त्रास वाढणे. यामुळे छातीवर दबाव जाणवतो.

 • Veteran Actor Dilip Kumar Hospitalised After Chest Infection

  या गोष्टींपासून दूर राहावे
  1. थंडीपासून दूर राहावे. म्हणजेच AC पासून लांब राहावे आणि थंडीच्या दिवसांमध्ये संपूर्ण काळजी घ्यावी.
  2. बस, ट्रेन, थिएटर आणि जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
  3. इन्फ्लूएंजाचे इंजेक्शन प्रत्येक वर्षी घ्यावे. 
  4. नेमोवेक (Nemovac) चे इंजेक्शन लहान मुलांना द्यावे. तसेच 65 वयानंतर पुन्हा घ्यावे.

Trending