आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी शोभासोबत बेधुंद होऊन नाचले 76 वर्षांचे जितेंद्र, मुलगी एकता कपूरने शेयर केला डान्स व्हिडीओ 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एकता कपूरने सोशल मीडियावर पिता रवि कपूर उर्फ जितेंद्र यांचा एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ते फिल्म 'जवानी दीवानी' (1972) चे गाणे 'सामने ये कौन आया' वर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओसोबत एकताने लिहिले, 'Killaaaa moves sitting!!!' व्हिडिओमध्ये 76 वर्षांचे जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर आणि अभिनेत्री मोना सिंहदेखील दिसत आहेत. तिघे बसल्या बसल्याच डान्स मूव्हज दाखवत आहेत.  

सोशल मीडिया यूजर्सलाही आवडली जितेंद्र यांची ही स्टाईल...
सोशल मीडिया यूजर्सला जितेंद्र ही स्टाईल खूप आवडत आहे. एका यूजरने लिहिले आहे, "काका आणि ऊह लाला काकू...क्या बात है...सुपर." दुसऱ्या एका यूजरची कमेंट आहे, "शोभा मॅम आणि जीतू सर सोबत सोबत खूप छान दिसतात." अनेक यूजर्सने जितेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. एकाने लिहिले, "हॅप्पी बर्थडे जीतू काका." एक यूजरची कमेंट आहे, "ओह माय गॉड जीतू सर खूप यंग आणि हँडसम दिसत आहेत....हॅप्पी बर्थडे सर...देव तुमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवो." जितेंद्र यांनी 7 एप्रिलला आपला 77 वा बर्थडे साजरा केला.