आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड : प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन, अमिताभ यांनी सांगितले. \'माझे यशस्वी झालेले सर्वाधिक सिनेमे त्यांनीच लिहिले आहेत\'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता आणि संवाद लेखक कादर खान यांचे सोमवारी 81 व्या वर्षी कॅनडामध्ये निधन झाले. त्यांचा मुलगा सरफराजने ही बातमी खरी असल्याचे सांगितले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांचे निधन झाल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, "ते खूप प्रतिभावंत आणि चित्रपटना वाहुन घेतलेले कलाकार होते, अतिशय छान लेखक होते, माझे अनेक यशस्वी सिनेमे त्यांनीच लिहिले आहेत, माझे खूप जवळचे मित्र आणि गणित शिकवणारे शिक्षकही होते''

काही दिवसांपूर्वीच कादर खान यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून बिग बींनी ट्विटरवे प्रार्थना केली होती. अमिताभ कादर खान या दोघांनी 'दो और दो पांच', 'अदालत', 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'कुली' आणि 'कालिया' अशा चित्रपटांत सोबत काम केले होते.  

 

डिसऑर्डरने ग्रस्त होते... 
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (पीएसपी) एक असामान्य मेंदूचा आजार आहे जो शरीराची गती, चालतांना स्वतःचे संतुलन, बोलणे, गिळणे, बघणे, मनःस्थिती आणि व्यवहारासोबतच चिचार करण्यावरही परिणाम करतो. हे डिसऑर्डर मेंदूमधील नर्व सेल्स नष्ट झाल्यामुळे होतो. कादर खान यांचा मुलगा सरफराजने सांगितल्यानुसार, कादर साहेबांवर 2017 मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली.

 

1973 पासून केली होती चित्रपटना सुरुवात... 
22 ऑक्टोबर 1937 ला काबुलमध्ये कादर खान यांचा जन्म झाला. 1973 मध्ये त्यांनी यश चोप्राची फिल्म 'दाग'पासून करियरला सुरुवात केली होती. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटनसाठी स्क्रिप्ट लिहिल्या. चित्रपटात काम करण्याआधी ते मुंबईतील एमएच साबू सिद्दीक इंजीनियरिंग कॉलेजमध्ये सिविल इंजीनियरिंगचे प्रोफेसर होते. कुटुंबात त्यांची पत्नी अजरा आणि दोन मुले सरफराज आणि शहनवाज खान आहेत. 

 

अमिताभ, जया प्रदा आणि अमरीश पुरीसोबत फिल्म बनवू इच्छित होते... 
एका इंटरव्यूदरम्यान कादर खान यांनी सांगितले होते की, "मला अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन फिल्म 'जाहिल' बनवायची होती. त्याचे डायरेक्शन मला स्वतःलाच करायचे होते. पण देवाला कदाचित काही वेगळेच पाहिजे होते, यादरम्यानच 'कुली'च्या सेटवर अमिताभला जखम झाली. ते कित्तेक महिने दवाखान्यात होते. अमिताभ परत आल्यानंतर मी दुसऱ्या चित्रपट व्यस्त होत. अमिताभही राजकारणात गेले. त्यानंतर माझ्या या चित्रपटाचे स्वप्न दूरच सारले गेले".