आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने चित्रपटांत दिले होते सर्वाधिक रेप सीन, 27 व्या वर्षी निधन, नाशिकमध्ये झाला होता जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये 60's आणि 70's च्या अॅक्ट्रेसेसबाबत बोलायचे झाल्यास नाजिमा यांचे नाव आपोआपच समोर येते. तसे पाहता नाजिमा चित्रपटांत सहायक भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या, पण त्यांच्या नावावर एक असा विक्रमही आहे, जो फारशा लोकांना माहिती नाही. नाजिमा बॉलिवूडची एकमेव अशी अॅक्ट्रेस होती जिने चित्रपटांत सर्वाधिक रेपसीन केले आहेत. तिने 'बेइमान' चित्रपटासाठी 1972 मध्ये बेस्ट सपोर्टींग अॅक्ट्रेस कॅटेगरीमध्ये फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले होते. 


27 व्या वर्षी कॅन्सरने निधन 
नाजिमाने अत्यंत कमी वयात बरेच काही मिळवले होते. अवघ्या 22 व्या वर्षी ती त्या काळातील हिरोईन्सच्या नजरेत खटकू लागली होती. तिच्या छोट्याशा करिअरमध्येच तिने 30 हून अधिक चित्रपटांत काम केले होते. 1975 मध्ये 27 व्या वर्षी तिचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. नाजिमाच्या निरागस लूकमुळे तिला अनेक चित्रपटांत हिरो किंवा हिरोईनच्या लहान बहिणीची भूमिका मिळत होती. त्याकाळात तर तिला 'बॉलिवूड की बहन' म्हटले जायचे. लीड हिरोइन म्हणून नाजिमाने फक्त एक चित्रपट केला होता. 1975 मध्ये रिलीज झालेला 'दयार-ए-मदीना'. 


यामुळे केले सर्वाधिक रेप सीन 
60 आणि 70 च्या दशकातील चित्रपटांत अनेकदा हिरो किंवा हिरोईनच्या लहान बहिणीवर बलात्काराचे सीन असायचे. त्यामुळे सपोर्टिंग भूमिका करणाऱ्या नाजिमाला त्या काळात सर्वाधिक रेप सीन करावे लागले. 


मिळत नव्हते लीड रोल 
नाजिमाला डायरेक्टर लीड रोल देत नव्हते. त्यामुळे काम मिळणे बंद होऊ नये म्हणून नाजीमा बहिणीसारखे सपोर्टींग रोल करायची. एका मुलाखतीत नाजिमाने म्हटले होते, मला डायरेक्टर लीड रोल का देत नाही ते मला माहिती नाही. पण मला कधीतरी ती भूमिका मिळेल यासाठी मी एकापाठोपाठ एक या भूमिका करत आहे. मला याचे कधीही दुःख झालेले नाही. उलट मी माझ्या कामावर आनंदी आहे. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणे अधिक चांगले असते. 


मृत्यूनंतर रिलीज झाले हे चित्रपट 
नाजिमाचा जन्म 1948 मध्ये नाशिकमध्ये झाला होता. तिने 'बेबी चांद' नावाने बालकलाकार म्हणून करिअर सुरू केले होते. देवदास, गंगा जमुना आणि हम पंछी एक डाल सारख्या चित्रपटांत तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले. नाजिमाचा अखेरचा चित्रपट 'रंगा खुश' होता. तो 1975 मध्ये तिच्या मृत्यूनंतर रिलीज झाला. त्याशिवाय 'संन्यासी' आणि 'दयार-ए-मदीना' हे चित्रपटही तिच्या मृत्यूनंतर रिलीज झाले. 


या चित्रपटांत केले काम.. 
10 वर्षांच्या करिअरमध्ये नाजिमाने 30 हून अधिक चित्रपट केले. त्यात उमर कैद (1961), जिद्दी (1964), निशान (1965), आए दिन बहार के (1966), राजा और रंक (1968), डोली (1969), अधिकार (1971), मेरे भैया (1972), बेइमान (1972), हनिमून (1973), अमीर-गरीब (1974), संन्यासी (1975), दयार-ए-मदीना (1975), रंगा खुश (1975) यांचा समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...