आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- छोट्या पडद्यावर अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांतून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे अल्प आजाराने बुधवारी झोपेतच निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काही वर्षांपूर्वी अतिशय लाेकप्रिय ठरलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेतून त्या घराघरात पोहोचलेल्या होत्या. यातील त्यांची “अक्का’ ची भूमिका खूप गाजली होती. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.
सध्या कलर्स वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. मात्र, त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, “काहे दिया परदेस’ या मालिकेत शुभांगी जोशी यांच्यासोबत काम केलेल्या सायली संजीव हिने आपल्याला या बातमीने धक्का बसल्याचे म्हटले आहे.
नातीची भूमिका साकारलेल्या 'गौरी'ने व्यक्त केल्या भावना
माझे आजी आजोबा मी लहान असतानाच गेले. त्यामुळे त्यांच फार काळ अनुभवता आलं नाही. पण याची सगळी कसर शुभांगी आजीने भरून काढली. माझे खूप लाड तीने केले. माझी पहिली मालिका आणि मला एक छान आजी मिळाली होती. मला केक खूप आवडतो. त्यामुळे ती सकाळी लवकर उठून माझ्यासाठी केक करून आणायची. इतके लाड तीने माझे पुरवले. आता या क्षणी मी तीच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत आहे.
– सायली संजीव, अभिनेत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.