Home | Gossip | veteran actresses wahida rehman and asha parekh in the show super dancer

शिल्पा शेट्टीला 81 वर्षांच्या वहीदा रहमान यांनी शिकवला डान्स, 'आज फिर जीने की तमन्ना है' गाण्यावर केला सुंदर डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 04:36 PM IST

मी नक्कीच काही पुण्य केले असेल, नाहीतर सहज नाही मिळत अशी संधी : शिल्पा... 

 • veteran actresses wahida rehman and asha parekh in the show super dancer

  मुंबई : टीव्ही रिएलिटी शो 'सुपर डांसर 3' च्या मंचावर अशातच वहीदा रहमान, आशा पारिक या पोहोचल्या होत्या. यादरम्यान 81 वर्षांच्या अभिनेत्रीकडून शिल्पा शेट्टी डान्स शिकत होती. त्यानंतर दोघीनींही शोच्या स्टेजवर 'आज फिर जीने की तमन्ना है' या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला गेला आहे, जो व्हायरल होत आहे. यासोबत कॅप्शन लिहिले आहे "कधीच न विसरता येणारे क्षण."

  शिल्पाने केले लहान मुलांसारखे वर्तन...
  व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी डान्सनंतर वहीदा रहमान यांच्यासमोर लहान मुलांसारख्या हरकती करताना दिसली. ती त्यांच्याभोवती फिरू लागते आणि सर्व स्टेप पटापट करते. जे पाहून थेतील सर्व लोक हसू लागतात. यांनतर सर्व पार्टीसिपंट मुले वहीदा यांच्या पाय पडतात आणि त्या त्यांना खूप आशीर्वाद देतात. शिल्पाने यावेळी ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत व्हाइट कलरची साडी घातली आहे. तसेच वहीदा ग्रीन साडीमध्ये दिसत आहेत.

  शिल्पाने अभिनेत्रीबरोबर डान्स करण्याबद्दल म्हणाली इमोशनल असे काही...
  शोमध्ये वहीदा रहमान आणि आशा पारिक यांनी चित्रपटातील अनेक किस्से सांगितले. वहीदा यांनी शोमध्ये येण्याबद्दल सांगितले, "सुमारे 20-25 वर्षांनंतर मी आज डान्स केला आहे. आज जो मला सन्मान आणि प्रेम मिळाले आहे ते खरच खूप मोठे आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद." या शोमध्ये जज म्हणून बसलेले अनुराग बासू म्हणाले, "या शोचा यह एपिसोड शानदार होता. मी इथे आहे हे माझे भाग्य आहे." यासोबतच शिल्पा शेट्टी म्हणाली, "मी नक्कीच काही पुण्य केले असेल, नाहीतर सहज नाही मिळत अशी संधी."

Trending