आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबात तीन विवाहित मुली आहेत. त्यांच्या पार्थिवावर सकाळी शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


अगदी लहानपणापासून संगीत शिक्षण घेतलेल्या करंदीकरांनी शास्त्रीय संगीताची तालीम यशवंतबुवा मराठे व नंतर छोटा गंधर्व यांच्याकडे घेतली होती. त्यानंतर भरत नाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी, मराठी रंगभूूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले. संगीत सौभद्र, संगीत मंदार माला, संगीत स्वयंवर, संगीत संशयकल्लोळ, संगीत वैरीण झाली सखी, शाहीर प्रभाकर, संगीत अभोगी या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला होता. पुणे महानगरपालिकेने मानाचा बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.

 

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनीक नरूभाऊ लिमये यांच्या नंतर भरत नाट्य संशोधन, मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे  सांभाळली. त्यापूर्वी ही त्यांनी संस्थेमध्ये अनेक पदे भूषविली. गेल्य काही महिन्यांपासून त्यांची तब्बेत बरी नव्हती. त्यातच पत्नीच्या निधनाचा धक्का ते सहन करू शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...