आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ज्येष्ठ नाटककार व लेखक प्रेमानंद गज्वी यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. गज्वी यांचा १९४७ मध्ये चंद्रपूरमध्ये जन्म झाला. साहित्य, पत्रकारिता, वृत्तपत्रीय लेखन असे कार्यक्षेत्र असलेले गज्वी हे नाट्यचळवळीशी जाेडले गेलेले अाहेत. प्रेमानंद गज्वी यांनी किरवंत, देवनवरी छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गाेरे, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापाेटी ही नाटके व साहित्यसंपदांचे लिखाण केले आहे.
‘गांधी-आंबेडकर’मधून मांडला महापुरुषांचा संघर्ष
ज्येष्ठ नाटककार अाणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली अाहे. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून गज्वी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. एक प्रयाेगशील अाणि विचारवंत नाटककार म्हणून प्रेमानंद गज्वी यांची नाट्य आणि साहित्यवर्तुळात लोकप्रियता आहे.
प्रेमानंद गज्वी यांचा १९४७ मध्ये चंद्रपूरमध्ये जन्म झाला. साहित्य, पत्रकारिता, वृत्तपत्रीय लेखन असे कार्यक्षेत्र असलेले गज्वी हे नाट्यचळवळीशी जाेडल्या गेलेले अाहेत. प्रेमानंद गज्वी यांनी ‘छावणी’, ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘डॅम इट अनू गाेरे’, ‘नूर महंमद साठे’, ‘शुद्ध बीजापाेटी’ अशा दर्जेदार नाटकांचे लेखन केले अाहे. ‘किरवंत’, ‘देवनवरी’ या नाटकातून त्यांनी दुर्लक्षित विस्थापितांची बाजू मांडली. गांधी-अांबेडकर या नाटकातून गज्वी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दाेन महापुरुषांमधील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे रेखाटला आणि तो नाट्यप्रेमींसमोर आणला. गज्वी यांचे केवळ नाट्यलेखनच लोकप्रिय नाहीत तर त्यांनी नाट्यलेखनाबराेबरच कथा आणि कवितासंग्रहाचेही लेखन केले आहे. ‘ढिवर डाेंगा’, ‘लागण’ हे त्याचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले अाहेत. ‘एकतारी’, ‘येताेय’ याबराेबरच ‘हवे पंख नवे’ हा डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्यावर आधारित असलेला त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध अाहे. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी गज्वी यांची निवड झाल्यानंतर साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन सुरू झाले आहे.
नाट्यसंमेलनाचे स्थळ अद्याप निश्चित नाही
आगामी ९९ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन कुठे होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. संमेलनाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, नागपूर, लातूर, पिंपरी चिंचवड या शहरांची नावे स्पर्धेत अाहेत. नाट्यसंमेलन समिती लवकरच या ठिकाणांचा दाैरा करून नाट्यसंमेलनाचे अंतिम ठिकाण निश्चित करणार अाहे.
‘घाेटभर पाणी’ एकांकिकेचे १४ भाषांमध्ये अनुवाद
नाट्य, कविता, कथा लेखनाबराेबरच गज्वी यांनी ‘घाेटभर पाणी’, ‘पांढरा बुधवार’ तसेच ‘समग्र’ एकांकिकांचे लेखन केले अाहे. त्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या ‘घाेटभर पाणी’ या एकांकिकेचा देशभरातील विविध १४ भाषांमध्ये अनुवाद करण्यात अाला अाहे. गज्वी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गाैरव पुरस्कार मिळाला आहे तसेच २००९ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नशिक शाखेच्या वतीने त्यांना वि.वा. शिरवाडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.