आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vice President M Venkaiah Naidu Breaks Down While Remembering Jaipal Reddy In Rajya Sabha

काँग्रेस नेते जयपाल रेड्डींची आठवण काढताच भावूक झाले उपराष्ट्रपती; मनमोहन सिंग म्हणाले, ते उत्तम प्रशासक होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी राज्यसभेत सोमवारी श्रद्धांजली देण्यात आली. या दरम्यान सभापती व्यंकैय्या नायडू भावूक झाले. रेड्डींचे रविवारी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांची आठवण काढताना ते माझे मित्र आणि मार्गदर्शक होते असे बोलताना उपराष्ट्रपती नायडूंना आपले अश्रू आवरले नाही. तर दुसरीकडे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रेड्डी एक उत्तम प्रशासक होते असे म्हणत त्यांचे स्मरण केले.


काय म्हणाले उपराष्ट्रपती नायडू?
उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी रेड्डींसोबत आपल्या 40 वर्षांच्या नाते-संबंधांना उजाळा दिला. ते म्हणाले, "मला आंध्र प्रदेशच्या विधानसभेत त्यांच्यासोबत दोन कार्यकाळ काम करण्याचे सौभाग्य लाभले होते. आम्ही दोघेही एकाच बाकावर बसत होतो. आमच्यात वेग-वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत असे. त्यावेळी विधानसभेच्या बैठकीला सकाळी 8 वाजताच सुरुवात व्हायची. आम्ही सकाळीच 7 वाजता नाश्ता करण्यासाठी सुद्धा भेटत होतो. ते माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठे होते आणि माझे मार्गदर्शक होते."


गरीब आणि वंचितांचे नेते होते रेड्डी -मनमोहन सिंग
रेड्डींची आठवण काढताना डॉ. मनमोहन सिंग यांनी रेड्डींच्या पत्नीला पत्र लिहून शोक व्यक्त केले. ते म्हणाले, "प्रिय मित्र आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते रेड्डी यांच्या जाण्याने खूप दुखी आहे. त्यांच्याकडे ज्ञान आणि अनुभवाचा भांडार होता. त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे. जयपाल रेड्डी यांनी नेहमीच गरीब आणि वंचितांसाठी खूप काम केले आहे."


रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 रोजी हैदराबादच्या मदगुल येथे झाला होता. त्यांचा राजकीय प्रवास आंध्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षावरून झाला होता. आंध्र प्रदेशच्या विभाजनापूर्वी ते 4 वेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. रेड्डींना 1998 मध्ये सर्वोत्कृष्ठ खासदाराचा पुरस्कार मिळाला होता. यूपीए-1 सरकारमध्ये ते शहरविकास मंत्री होते. तर यूपीए-2 मध्ये त्यांना शहर विकास खात्यासह पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...