आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतरही उपप्राचार्यांचे यावल महाविद्यालयात पूर्णवेळ ज्ञानदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यावल : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर प्रामुख्याने कुटुंबाला वेळ देण्याचे नियोजन केले जाते. मात्र, यावल महाविद्यालयातील निवृत्त उपप्राचार्य प्रा.पी.एस.पाटील हे या उक्तीला अपवाद ठरले आहेत. पाच महिन्यांपुर्वी निवृत्त होऊनही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हीत जोपासून ते महाविद्यालयात पूर्णवेळ मोफत ज्ञानदान करत आहेत. महाविद्यालयात प्राध्यापकांच्या २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन निवृत्तीनंतरही त्यांनी सेवेचा वसा जोपासला आहे. 


येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९८४ मध्ये प्रा. प्रमोद सोनू पाटील (रा.फेकरी, ता.भुसावळ) हे विनाअनुदान तत्वावर नोकरीस लागले. १९८९ मध्ये अनुदान प्राप्त झाल्यावर प्रा.पाटील यांना वेतन मिळू लागले. त्यांच्या पत्नी निशा पाटील यांनीही शिक्षिका म्हणून नोकरी सुरु केली. कालांतराने प्रा.पाटील यांनी बढती मिळत गेली, ते यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले. ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सप्टेंबर २०१८ मध्ये निवृत्त झाले. मात्र, ज्या महाविद्यालयात ज्ञानदान केले, त्या महाविद्यालयासोबत उपप्राचार्यांचा ऋणानुबंध जुळला होता. त्यामुळे प्राचार्य डॉ. एफ.एन. महाजन यांनी निवृत्तीनंतरही ज्ञानदान कायम ठेवावे, अशी विनंती केली. उपप्राचार्य पाटील यांनी तत्काळ होकार दिला. विशेष म्हणजे उपप्राचार्य पाटील यांना मुलबाळ नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य समर्पित केल्याची भावना उपप्राचार्य प्रा.पाटील यांनी व्यक्त केली. 

सेवा महत्त्वपूर्ण  
यावल महाविद्यालयात प्राध्यापकांची ३३ पदे मंजूर आहेत. मात्र, आज रोजी प्राचार्यांसोबत केवळ १३ प्राध्यापक कार्यरत असून २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे निवृत्त उपप्राचार्य प्रा.पी.एस.पाटील यांच्याकडून मिळणारी सेवा महत्वपूर्ण ठरत आहे. 
प्राध्यापकांची भरती प्रक्रिया थांबली आहे 

 

उपप्राचार्य प्रा. पी. एस. पाटील यांचा आदर्श 

उपप्राचार्य पी.एस.पाटील हे गणित विषयाचे तज्ज्ञ आहेत. सध्या शासनाच्या धोरणानुसार प्राध्यापकांची भरती प्रक्रिया थांबली आहे. २० प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने महाविद्यालयात तारेवरची कसरत करावी लागते. प्रा.पी.एस.पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतरही शिकवण्याचा घेतलेला निर्णय महाविद्यालयास आधार ठरत आहे. डॉ. एफ.एन.महाजन, प्राचार्य, यावल महाविद्यालय 

बातम्या आणखी आहेत...