आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः शनिवारी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाच्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपटातील हीरो विक्की कौशल आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी इमोशनल होऊन भास्करबरोबर चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या.
विक्की म्हणतो, 'मी एकटा माझ्या खांद्यावर एखादा चित्रपट पेलू शकतो, ही हिम्मत या चित्रपटाने मला दिली आहे. आमचा हेतू प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा होता. जर यात आम्ही यशस्वी झालो नसतो, तर माझ्यात इतके धैर्य आले नसते. संपूर्ण चित्रपटाच्या वेळी माझे फोकस फक्त 100% देण्यावर होते.
'क्षणभरासाठीही कुणीही चित्रपटाला कमी लेखले नाही'
रॉनी म्हणाले, 'चित्रपटाच्या अभिनय कार्यशाळेदरम्यान मी विक्कीला, मी थकलो आहे किंवा हे खूप जास्त आहे असे बोलताना कधीही ऐकले नाही. हा भारतीय सैन्याला समर्पित चित्रपट होता, क्षणभरासाठीही कोणीही हा चित्रपटाला कमी लेखले असा क्षण आला नाही. '
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.