आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी कौशल बनला बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता, अजय देवगनसह या अभिनेत्यांना पछाडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः नुकत्याच रिलीज झालेल्या 'भूत' या आपल्या भयपटानंतर बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता बनलेला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत बॉलिवूड अभिनेत्यांना मागे टाकत विकी कौशल लोकप्रियतेत शिखरावर असलेला दिसून आलेला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

या आकडेवारीनूसार, व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकी कौशलने 100 गुणांसह लोकप्रियतेत प्रथम स्थान पटकावले आहे. विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘भूत’मूळे आणि कतरिना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमुळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे आणि यामुळे तो नंबर वन स्थानी पोहोचला.


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर 46 गुणांसह दूस-या स्थानी आहे. शाहिदचा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, त्यानंतर त्याने चित्रीकरण पून्हा सुरू करणे, आणि त्यानंतर त्याची पत्नी मीरासोबत शाहिदने साजरा केलेला वाढदिवस या सगळ्या कारणांमुळे तो गेले काही दिवस सतत चर्चेत होता आणि म्हणूनच तो बाकी बॉलिवूड स्टार्सना मागे टाकून दूस-या स्थानी पोहोचलेला आहे.

कार्तिक आर्यनची फिल्म ‘लव आज कल 2’बॉक्स ऑफिसवर जरी चांगली चालली नाही. तरीही त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही आहे. आजही कार्तिक युवावर्गात खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच तो 41 गुणांसह तिस-या स्थानी आहे.

टाइगर श्रॉफची फिल्म ‘बागी 3’ रिलीज झाल्यानंतर तो लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करताना दिसतोय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, टाइगर 38 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. बॉक्स ऑफिसवर 280 कोटी पार केलेली फिल्म 'तान्हाजी'मुळे सुपरस्टार अजय देवगन लोकप्रियतेत अजूनही दिसून येतोय. 36 गुणांसह अजय पाचव्या स्थानी आहे.  
 
 

बातम्या आणखी आहेत...