आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vicky Kaushal Hits The Chart Of Score Trends, Becoming The Most Famous Bollywood Actor

स्कोअर ट्रेंड्सच्या चार्टवर विकी कौशलने मारली बाजी, बनला सर्वात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विकी कौशलने सध्या खूप लोकप्रियता मिळवली आहे. स्कोअर ट्रेंडस इंडियाच्या व्हायरल न्यूज कॅटेगिरीमध्ये विकी सध्या टॉपवर आहे. तो टॉपवर असल्याचे अमेरिकेची मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंडस इंडियाने घोषित केले आहे. त्यांच्या अहवालानुसार व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकीने 100 टक्के लोकप्रियता मिळवून नंबर एकचे स्थान मिळवले आहे. 

  • लिस्टमधील टॉप पाच बॉलिवूड स्टार...

पहिल्या क्रमांकावर विकी कौशल... 

व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकीने 100 टक्के लोकप्रियता मिळवून नंबर एकचे स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वीचा ‘भूत’ चित्रपट आणि कतरिना कैफसोबतच्या मैत्रीमुळे तो टॉपवर आहे. 

दुसऱ्या क्रमांकावर शाहिद कपूर... 

शाहिद कपूर 46 टक्के घेऊन दुसऱ्या स्थनावर आहे. शाहीदला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली होती तरीदेखील तो चित्रीकरणासाठी आला या बातमीमुळे तो चर्चेत होता. तसेच आपल्या पत्नीसोबतचे वाढदिवस साजरा केल्याच्या फोटो फोटोंमुळेही तो चर्चेत होता.

तिसऱ्या क्रमांकावर कार्तिक आर्यन... 

41 टक्क्यांसोबत कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकचा चित्रपट ‘लव्ह आज कल 2’ चांगले प्रदर्शन करू शकली नाही. तरीदेखील तरुणांमध्ये तो प्रसिद्ध झाला. 

चौथ्या क्रमांकावर टायगर श्रॉफ... 

38 टक्क्यांसोबत टायगर चौथ्या क्रमांकावर आहे. ‘बागी 3’ च्या नंतर त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाल्याचे दिसते. मुलींमध्ये त्याची सध्या खूप क्रेझ आहे. 

पाचव्या क्रमांकावर अजय देवगण... 

36 टक्क्यांसोबत अजय देवगण लोकप्रियतेमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. ‘तान्हाजी..’ चित्रपटाच्या यशामुळे त्याला हे स्थान मिळाले आहे.