आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद उधमसिंह बायोपिकसाठी विकीने घटवले १३ किलो वजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकी कौशलने शहीद उधमसिंह बायोपिकसाठी आपले १३ किलो वजन कमी केले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याला विचारले, तू सध्या खूप बारीक दिसत आहेस, कसली तयारी करत आहेस ? यावर त्याने सांगितले, मी उधमसिंह बायोपिकसाठी फक्त ३ महिन्यांत १३ किलो वजन कमी केले. या चित्रपटात त्याला २० वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारायची आहे. शूटिंग अमृतसर पंजाबमध्ये याच आठवड्यात सुरू होणार आहे.

प्रभावित झाले शुजित
शुजित सरकारच्या आगामी 'शहीद उधमसिंह' चित्रपटात विकी त्यांच्या तरुणापणाची भूमिका साकारण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी त्याने बरेच वजन कमी केले आहे. विकीचे हे समर्पण पाहून दिग्दर्शक शुजित सरकार खूपच प्रभावित झाले. विशेष म्हणजे विकी खूप खातो, असे म्हटले जाते. मात्र तरीदेखील त्याने आहारावर नियंत्रण ठेऊन पूर्ण तीन महिन्यात वजन कमी केले. कामाच्या बाबतीत तो कुठलीच तडजोड करत नाही.

'तख्त' साठी वाढवावे लागेल वजन
'शहीद उधमसिंह' बायोपिकनंतर विकी करण जोहरच्या 'तख्त'चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटासाठी त्याला पुन्हा वजन वाढवावे लागणार आहे. या चित्रपटात तो मुघल शासक औरंगजेबची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जातेे. शिवाय हा मेगाबजेट चित्रपट असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...