• Home
  • Bollywood
  • News
  • Vicky Kaushal's 'Ghost : The Haunted Ship' collides with Amitabh Bachchan and Imran Hashmi's film.

आगामी / अमिताभ बच्चन आणि इम्रानचा हाश्मी यांच्या चित्रपटासोबत होणार विकी कौशलच्या 'भूत : द हॉन्टेड शिप'ची टक्कर 

आधी आयुष्मानच्या चित्रपटासोबत होत असलेल्या क्लॅशमुळे विकीच्या चित्रपटाची बदलली डेट 

Sep 22,2019 10:54:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : विकी कौशलच्या भूमिकेने सजलेल्या 'भूत : द हॉन्टेड शिप' चित्रपटाचा पहिला भाग या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र निर्मात्यांनी पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम अजून पूर्ण झाले नाही, म्हणून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. शिवाय या चित्रपटाची टक्कर आयुष्मान खुराणाच्या बालासोबत होणार होती, म्हणून निर्माते मागे सरकल्याचे बेालले जात आहे. या दोन्ही चित्रपटांत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलली. खरं तर, २१ फेब्रुवारीला रिलीज झाल्यानंतरही या चित्रपटाची दोन मोठ्या चित्रपटांशी टक्कर होणार आहे. या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाशमी अभिनीत चेहरे आणि अनुराग बसूचा नाव न ठरलेला चित्रपटही रिलीज होणार आहे.

X