आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vicky Kaushal's Insta Picture Caught The Attention Of All, Fans Were Shocked To See His Rs 22 Lac Watch

विकी कौशलच्या इंस्टापिक्चरने वेधले सर्वांचे लक्ष, 22 लाख रुपयांचे घड्याळ पाहून चाहते चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता विकी कौशलच्या अभिनयाशिवाय त्याची नविन घड्याळ त्याच्या चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. नुकतेच त्याने शेयर केलेल्या एका फोटोमध्ये ओक्टो फिनिसिमो स्केलेटन नामक घड्याळ त्याने हातात घातले आहे. विशेष म्हणजे या घड्याळाची किंमत लाखोंच्या घरात आहे. २२ लाख ८० रुपयांच्या या किंमतीत एक एसयुव्ही चारचाकी विकत घेतली जाऊ शकते. नुकतेच चित्रपट निर्माते रोहित शेट्टींने ३ कोटीची लेम्बोर्गिनी कार विकत घेतली आहे. 'सरदार ऊधम सिंह'च्या तयारी व्यग्र असताना विकीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टायलिश फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेता ब्लेजर आणि स्वेटशर्टसोबत 22 लाख रुपयांची घडी घातलेला दिसत आहे. फोटो व्हायरल होताच फॅन्स यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. हा फोटो त्याने मॅगझीन कव्हरसाठी काढला आहे. तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

यावर्षी रिलीज झालेल्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' ने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सध्या अभिनेता आपला आगामी चित्रपट 'सरदार ऊधम सिंह', 'भूत' आणि मनेकशॉ यांचा बायोपिक करण्यात व्यस्त आहे.   

बातम्या आणखी आहेत...