Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | victim attempt suicide in the murder case of girl

युवतीच्या खून प्रकरणातील संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न; राजीव गांधी भवनसमोर घेतले विषारी औषध 

प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 11:50 AM IST

संशयिताने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने त्याची प्रकृती बिघडली आहे.

  • victim attempt suicide in the murder case of girl

    नाशिक- कॉलेजरोडवरील एका इमारतीच्या छतावर पत्नीचा गळा आवळून खून करत फरार झालेला संशयित पती जयेश दामोधर याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. ११) दुपारी राजीव गांधी भवनसमोर हा प्रकार घडला. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने संशयिताला वाचवण्यात यश आले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ८) मध्यरात्री पायल नावाच्या युवतीचा मृतदेह सत्यम लीला इमारतीच्या छतावर सापडला होता. पायलची आई सरला परदेशी यांच्या तक्रारीनुसार, तिचा प्रियकर जयेश रामचंद्र दामोधर (२३, रा. पंचवटी) याने तिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार गंगापूर पोलिसांत दिली होती. संशयित जयेशच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसापासून तो फरार होता. पथक त्याचा शोध घेत होते. दुपारी तो पंचवटीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राजीव गांधी भवनसमोर अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला.


    प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब
    संशयिताने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने त्याची प्रकृती बिघडली आहे. उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई केली जाईल. जबाबामध्ये खुनाचे नेमके कारण समोर येणार असल्याचे गंगापूर पोलिसांनी सांगितले.

Trending