आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय दिन : कारगिलसारखी चूक पाकिस्तान पुन्हा करणार नाही : लष्करप्रमुख रावत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - लष्करी मुख्यालयाच्या रचनेतील बदलास संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली. फेररचनेच्या योजनेवर आम्ही सध्या काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर रावत पत्रकारांशी बोलत होते. भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने लष्कराला बळकट, आणखी घातक असे दल बनवण्याची शिफारस रावत यांनी केली होती. आता दिल्लीत पोस्टेड सेनेच्या २० टक्के अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. २२९ अधिकाऱ्यांना त्यामुळे क्षेत्रीय विभागात पाठवण्याची योजना आहे. यादरम्यान पाककडून पुन्हा कारगिल युद्ध छेडण्याच्या प्रश्नावर रावत म्हणाले, पाकिस्तानने प्रत्युत्तर पाहिले आहे. पुन्हा अशा हिंमत करणार नाही. 

 

रणनीती बनवण्यासाठी स्वतंत्र उपलष्करप्रमुख असेल, सायबर प्रकरणांच्या निगराणीसाठी अधिकारी 
सैन्य मुख्यालयाच्या फेररचनेची संकल्पना बिपिन रावत यांची आहे. नवीन याेजनेमुळे लष्कराच्या दोन उपलष्करप्रमुखांव्यतिरिक्त आणखी तिसरे उपलष्करप्रमुख पद मिळणार आहे. या पदावरील व्यक्ती सैन्य गुप्तहेर, माहिती-शस्त्रागार, लष्करी माेहिमांच्या संचालकांत समन्वयाचेही काम करतील. त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. युद्धासंबंधीची माहिती देण्यासाठी लेफ्टनंट जनरल श्रेणीतील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे रावत यांनी सांगितले. 
 

 

पारदर्शकतेसाठी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती
योजनेनुसार उपलष्करप्रमुख (योजना व व्यवस्थापन) पदाचे उपप्रमुख (क्षमता विकास) यात परिवर्तित केले आहे. फेररचना, आधुनिकीकरण व महसुलाची जबाबदारी अधिकाऱ्याकडे असेल. पारदर्शकतेसाठी लष्करप्रमुखांच्या अंतर्गत मेजर जनरल श्रेणीच्या नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. 

 

तयारीच्या पाहणीसाठी रावत यांचा नियंत्रण रेषेचा दौरा 
जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन जनरल रावत यांनी अलीकडेच नियंत्रण रेषेवरील अखनूर भागाचा दौरा केला. त्यात लष्करी तयारीचा आढावा घेतला होता. व्हाइट नाइट कॉर्प्सवर दाखल होत पाककडून गोळीबार झाल्यानंतर उत्तर देणे व इतर तांत्रिक तयारीची माहिती घेतली होती. 
 

कारगिलमधील शूरांना व्हिडिआे समर्पित

देशाचे टेहळणी दल सीमेवर कडक पहारा देत आहे. सीमेवरील प्रत्येक भागात कडक निगराणी केली जाते. म्हणूनच पाकिस्तान पुन्हा काही चूक करेल, असे वाटत नाही. तशी हिंमतच तो करणार नाही, असे रावत म्हणाले. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कारगिलमधील शूरांच्या स्मृतीत व्हिडिआे समर्पित करण्यात आला. 
 

बातम्या आणखी आहेत...