आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळामुळे विदर्भात भाजपवर नाराजी; नक्षलवादावर नियंत्रणाचा फायदा हाेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - महाराष्ट्रातील विदर्भात पाेहोचलाे तेव्हा दुष्काळाची चाहूल लागली हाेती. शेतकरी आत्महत्येमुळे हा भाग कुप्रसिद्ध आहे. तीन वर्षांपासून या भागात दुष्काळ आहे. येथील फक्त जमीनच काेरडी झाली नाही तर शेतकऱ्यांची स्वप्नेही पापडी बनवून उखडू लागली आहेत. नागपुरात राहणारे शाहदेव रागात म्हणतात, सरकार तर आम्हाला मृतप्राय समजत आहे. आम्हाला विचारताे तरी काेण? म्हणण्यास दाेन हेक्टरची जमीन आहे. डाळिंबाची शेती करताे. परंतु मिळते काय? शाहदेव यांना जेव्हा शेतकरी सन्मान याेजनेसंदर्भात विचारले तेव्हा डाेळे वटारून ते म्हणाले, आतापर्यंत काेणाला मिळाले पैसे? शाहदेव यांचा राग सर्व सांगून गेला.   


एका संशोधनानुसार, १९९७ ते २००६ दरम्यान आत्महत्या करणारा प्रत्येक पाचवा शेतकरी महाराष्ट्रातील हाेता. महाराष्ट्रातील ४८ पैकी दहा जागा विदर्भातून येतात. त्यात पूर्व व पश्चिम असे दाेन भाग आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास विदर्भातील ६ पैकी ५ जागांवर भाजप, तर पश्चिम विदर्भातील ४ पैकी ३ जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत.  ‘फेव्हिकॉल का मजबूत जोड़’ म्हटली जाणारी भाजप-शिवसेनेची युती विदर्भात दमदार आहे. परंतु ग्रामीण भागात नाराजी दिसून येत आहे. शेतकरी सन्मान याेजना मजाक झाली आहे. विदर्भातील सर्वाधिक हाॅट सीट नागपुरातील आहे. येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरले आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे नाना पटाेले यांच्याशी हाेणार आहे. पटाेले भंडारा-गाेंदिया मतदारसंघातून मागच्या वेळी भाजपकडून निवडून आले हाेते. त्यांना मंत्री न केल्यामुळे नाराज हाेऊन ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने मुस्लिम, मागासवर्गीय व कुणबी जातीतील सहा लाख मतदारांच्या जाेरावर पटाेले यांना उभे केले आहे.  विदर्भातील राजकीय विश्लेषक प्रा. जवाहर चरडे म्हणतात, गडकरी यांनी विकासाबरोबर जातीचे गणितही मजबूत ठेवले आहे. भाजपने कुणबी समाजातून दाेन महापाैर, दाेन आमदार दिले आहेत. ते पटाेले यांची मते कमी करतील. भाजपच्या व्हाेटबँकमध्ये अडीच लाख तेली, एक लाख महाराष्ट्रीय  ब्राह्मण व सिंधी, पाच लाख आेबीसी व अडीच लाख हिंदी भाषिक आहेत. दुसरीकडे कांॅग्रेसचे संघटन येथे कमकुवत आहे. संघाचे मुख्यालय असल्यामुळे भाजप येथून  मजबूत आहे. नागपूरजवळ रामटेक हा मतदारसंघ आहे. या जागेवरून पी. व्ही. नरसिंह राव  एकदा खासदार झाले हाेते. पत्रकार व लेखक संजय तिवारी यांच्यानुसार, शिवसेनेचे संघटन येथे मजबूत नाही. सेनेला भाजपवर अवलंबून राहावे लागेल. या भागात संत्रा हे मुख्य पीक व उपजीविकेचे साधन आहे. त्याचे पूर्ण काम राेखीमध्येच हाेते. ३० हजार  रुपये प्रतिटन असलेला संत्रा नाेटबंदीदरम्यान १२ हजारांपर्यंत घसरला हाेता.   


वर्धा येथून मागील निवडणुकीत नरेंद्र माेदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारास सुरुवात केली हाेती. येथे भाजपचे रामदास तडस खासदार आहेत. ते महाराष्ट्रातील तेली समाजाचे अध्यक्ष आहेत. या समाजाचे या भागात चांगलेच वर्चस्व आहे. काँग्रेसने चारुलता राव यांना निवडणुकीत उतरवले आहे.   
चंद्रपूर सर्वाधिक तापमान असणारा भाग आहे. भरउन्हाळ्यात ही निवडणूक आहे. येथील शेतकरी शंकर म्हणतात, माेदीजींनी चहापर चर्चेदरम्यान म्हटले हाेते, शेतकऱ्यांचा कापूस सरळ फॅक्टरीत जाईल. त्यांना चांगले दर मिळतील. शेतकऱ्यांनी भाजपला चांगले मतदान केले. परंतु माेदीजींनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही.  एसटी आरक्षित गडचिरोली-चिमुर लाेकसभा मतदारसंघात सहा लाख आदिवासी आहेत. त्यातील एक लाख दाट जंगलात राहतात.  डाॅ. देवराव होली यांच्या मतानुसार, मागील पाच वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने नक्षलवाद्यांवर चांगले नियंत्रण मिळवले आहे. विकासासाठी चांगला निधी दिला आहे. त्यांचा भाजपला फायदा हाेऊ शकताे.

 


भंडारा-गोंदिया  लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या खात्यात जाऊ शकताे. या मतदार संघात मोदी लहरमुळे नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला हाेता. आता पटोले  नागपूरमधून कांॅग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. 
 

 

मुद्दे : शेतकरी आत्महत्या, नाेटबंदी, जीएसटी {शेतकऱ्यांची अात्महत्या या जागांवर सर्वात माेठा मुद्दा आहे. हा मुद्दा निर्णायक सिद्ध हाेऊ शकताे. जीएसटी व नोटबंदीचा प्रभाव दिसत आहे. शेतीकामांसाठी लाेक दुसऱ्या राज्यांत जात आहेत. बेराेजगारीही माेठा फॅक्टर आहे. नोटबंदी-जीएसटीमुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. पुलगाव-आरवी लाइन व यवतमाळ-परतवाडा लाइन अनेक वर्षांपासून बंद आहे. 

 

आघाडीचे गणित : भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. बसप व प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेस-एनसीपी आघाडीचे नुकसान हाेऊ शकते.  घाडीचे गणित {भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. बसप व प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेस-एनसीपी आघाडीचे नुकसान हाेऊ शकते.  

 

 

जातीचे समीकरण : कुणबी, बंजारा, माळी, तेली, मुस्लिम, दलित निर्णायक मतदार आहेत. तेली-माळी-हिंदी भाषिक व ओबीसी भाजपसोबत असल्याचे म्हटले जाते. कुणबी, मुस्लिम, बंजारा व दलित काँग्रेससाेबत दिसत आहेत.