आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भ दुसऱ्यांदा चॅम्पियन : रणजी ट्राॅफी फैज फजलच्या नेतृत्वाखाली विदर्भाने जिंकला किताब 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सामनावीर अादित्य सरवटेच्या (६/५९) फिरकीच्या बळावर विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी ट्राॅफी अापल्या नावे केली. सलगच्या ११ सामन्यातील विजयाने विदर्भाला दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. विदर्भाने फायनलमध्ये गुरुवारी जयदेव उनाडकतच्या साैराष्ट्र संघावर मात केली. यजमान विदर्भाने ७८ धावांनी अंतिम सामना जिंकला. विजयाच्या २०६ धावांच्या प्रत्युत्तरात साैराष्ट्र संघाला ५८.४ षटकांत १२७ धावांवर अापला गाशा गुंडाळावा लागला. अादित्यने प्रतिस्पर्धी साैराष्ट्राचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यासह विदर्भाला सलग दुसऱ्यांदा किताबावर अापले नाव काेरता अाले. फैज फजलच्या कुशल नेतृत्वात विदर्भाला सलग दुसऱ्या सत्रात हा पल्ला गाठता अाला. सलग दाेन वेळा अापल्या टीमला जेतेपद मिळवून देणारा फैज फजल हा ११ वा कर्णधार ठरला. सलग दुसऱ्यांदा ट्राॅफी जिंकणारा विदर्भ हा सहावा संघ ठरला. यापूर्वी मुंबईसह महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कर्नाटकने असे यश मिळवले. विदर्भाने गत सत्रात दिल्लीचा फायनलमध्ये पराभव केला हाेता. अाताच्या अंतिम सामन्यात ११ विकेट घेणारा अादित्य हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 

खडतर लक्ष्यच्या प्रत्युत्तरात साैराष्ट्र संघाने कालच्या ५ बाद ५८ धावांवरुन सुरुवात केली. मात्र, गुरुवारी पाचव्या दिवशीही टीमला डाव सावरता अाला नाही. टीमच्या तळातल्या फलंदाजांचा गाेलंदाजांसमाेर फाळ काळ निभाव लागला नाही. यातूनच साैराष्ट्राला ५८.४ षटकांत १४८ धावांपर्यंत मजल मारली. 

 

पुजारा अादित्यमुळे सपशेल अपयशी : फायनलसाठी साैराष्ट्राला पुजाराकडून माेठ्या खेळीची अाशा हाेती. मात्र, त्याला एक धावा काढता अाली. त्याला अादित्यच्या फिरकीसमाेर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. पुजाराला फायनलच्या दाेन्ही डावांत १ अाणि ० धावांची खेळी करता अाली. त्याने फायनलमध्ये केवळ एक धावा काढली. 

 

78 धावांनी साैराष्ट्र संघावर फायनलमध्ये केली मात 

अादित्य सहावा गाेलंदाज 
विदर्भाच्या युवा फिरकीपटू अादित्य सरवटेने फायनलमध्ये एकूण ११ बळी घेतले. यामध्ये पहिल्या डावातील पाच अाणि दुसऱ्या डावातील सहा विकेटचा समावेश अाहे. अशाप्रकारे रणजी ट्राॅफीच्या इतिहासात फायनलच्या दाेन्ही डावात पाच वा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा अादित्य हा सहावा गाेलंदाज ठरला. यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. त्याने या दाेन्ही डावात साैराष्ट्रच्या पुजाराला स्वस्तात बाद केले. 

 

वसीम जाफरचा परफेक्ट टेन 
चॅम्पियन टीमच्या सदस्य खेळाडू अाता काेचच्या भूमिकेत 

विदर्भने प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा रणजी ट्राॅफी जिंकली. चंद्रकांत हे माजी चॅम्पियन संघाचे सदस्य खेळाडू हाेते. अाता ते काेचच्या भुमिकेत अाहेत. ते १९८३-८४ च्या व १९८४-८५ च्या रणजी चॅम्पियन मुंबईचे सदस्य खेळाडू हाेते. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाच्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी सहाव्यांदा रणजी ट्राॅफी जिंकणारा प्रशिक्षक म्हणून बहुमान मिळवला. त्यांच्या मार्गदर्शनात मंुबईने (२००२-०३, २००३-०४ अाणि २०१५-१६) तीन वेळा, राजस्थान संघाने (२०११-१२) एक वेळा अाणि अाता विदर्भाने (२०१७-१८, २०१८-१९)दाेन वेळा रणजी ट्राॅफी पटकावली अाहे. 

 

- १३३१ धावा मिलिंद कुमारच्या (सिक्कीम) यंदाच्या सत्रात नाेंद. ताे सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू. यात ६ शतके. 
- ६८ विकेट अाशुताेष अमानच्या (बिहार). एका सत्रात सर्वाधिक विकेटचा त्याने ४४ वर्षांपूर्वीच्या बिशनसिंग बेदीचा (६४) विक्रम मागे टाकला. 
- ०६ हॅट््ट्रिकची यंदा सत्रात नाेंद. हा हॅट््ट्रिकचा विक्रम. 
- २० द्विशतके यंदाच्या सत्रात साजरी झाली. २०१६-१७ च्या सत्रात सर्वाधिक २४ द्विशतके हाेती. 
- ०८ द्विशतके पारस डाेगराच्या (पुड्डुचेरी) नावे. त्याने दिल्लीच्या अजय शर्माला (७) मागे टाकले. 
- ०७ गाेलंदाजांनी ५० वा त्यापेक्षा अधिक बळी घेतले. सत्रात सर्वाधिक बळींचा विक्रम. 

 

11 सामने : विदर्भ संघाने यंदाच्या सत्रात जिंकले 
 
विदर्भ : पहिला डाव ३१२, दुसरा डाव : २०० साैराष्ट्र :पहिला डाव : ३०७, कालच्या ५ बाद ५८ धावांवरून पुढे 
साैराष्ट्र (दुसरा डाव) धावा चेंडू ४ ६ 
जडेजा पायचीत गाे. अादित्य सरवटे ५२ १३७ ०६ ० 
मकवाना त्रि.गाे. अादित्य सरवटे १४ ४५ ०२ ० 
मंकड पायचीत गाे. अक्षय वखरे ०२ ०२ ०० ० धर्मेंद झे. अादित्य गाे. अक्षय वखरे १७ ५६ ०२ ० 
जयदेव पायचीत गाे. अादित्य सरवटे ०७ १५ ०१ ० 
सकारीया नाबाद ०२ ०७ ०० ० 
अवांतर : ०१. एकूण : ५८.४ षटकांत सर्वबाद १२७ धावा. गाेलंदाजी : अादित्य सरवटे २४-६-५९-६, उमेश यादव १०-१-३१-१, अक्षय वखरे २२.४-६-३७-३, कर्नेवार २-२-०-०. 


 

बातम्या आणखी आहेत...