आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vidarbha Cricket Association Becomes The First In The Country To Implement The Recommendations Of The Lodha Committee

विदर्भ क्रिकेट असाेसिएशन ठरली लाेढा समितीच्या शिफारशी लागू करणारी देशात पहिली; तर त्रिपुरा दुसरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक  

औरंगाबाद - विदर्भ क्रिकेट असाेसिएशनने क्रिकेटमध्ये अल्पावधीत वेगळा ठसा उमटवला आहे. यामागे सातत्याने राबवण्यात येणाऱ्या खास माेहिमेचे माेलाचे याेगदान  ठरले आहे. गत १८ वर्षांपासून संघटनेवर बिनविराेध असलेल्या पाच सदस्यांनी संलग्न ११ जिल्ह्यांत  खास माेहीम राबवली. याच्या माध्यमातूनच आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र अशी प्रशिक्षण अकादमी आणि प्रशस्त मैदान तयार करण्यात आले. यातूनच दरवर्षी ९०० पेक्षा अधिक सामन्यांचे आयाेजन केले जाते. याशिवाय नागपूरमध्ये युवा खेळाडूंसाठी खास निवासी प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे. 

२००१ पासून निवडणूक नाही :
गत १८ वर्षांपासून विदर्भ क्रिकेट संघटनेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे २००१ पासून आजतागायत या संघटनेवरील पाच सदस्यांची बिनविराेध निवड करण्यात आली आहे. यासाठी सर्वच सदस्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष मनाेहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बिनविराेध निवड केली जाते. संघटनेच्या स्थापनेला आता ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. 

ग्रामीण खेळाडूंची संख्या वाढली : 
संघटनेच्या माेहिमेमुळे ११ जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून  खेळाडूंची संख्या झपाट्याने वाढली. प्रत्येक गटात ७० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेेले दिसतात.
 

दरवर्षी २७ काेटी; विकासावर हाेताे खर्च :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दरवर्षी फंडाच्या स्वरूपामध्ये विदर्भ क्रिकेट असाेसिएशनला २७ काेटी रुपये मिळतात. फंडाची ही रक्कम शिफारशी लागू करणाऱ्या सर्वच राज्य संघटनांना दिली जाते. मात्र, व्हीसीएने याच फंडाच्या माध्यमातून आपल्या अंतर्गत असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये क्रिकेटचा दर्जा उंचावण्याची माेहीम यशस्वी केली आहे. यातूनच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुविधांनी परिपूर्ण आणि प्रशस्त असे मैदान, तसेच प्रशिक्षण सेंटर सुरू करण्यात आले आहेत. 

कामगिरी उंचावण्यासाठी खास काेचिंग
>: विदर्भ क्रिकेट असाेसिएशन प्रशिक्षण सत्रात माजी क्रिकेटपटू युवांना खास मार्गदर्शन करतात.
> यामध्ये १३, १४,१५, १६, १९ वर्षाखालील आणि आेपन गटांच्या स्पर्धांचा समावेश आहे. 
> महिलांसाठी १६, १९ आणि आेपन गटातील स्पर्धांचेही आयाेजन संघटनेच्या वतीने केले जाते.
 

संघटनेचे ४ झाेन (नागपुर स्वतंत्र्य)
> अकाेला झाेन : अकाेला,वाशिम, बुलडाणा. 
> अमरावती : अमरावती, वर्धा, यवतमाळ. 
> गडचिराेली झाेन : गडचिराेली, चंद्रपूर.
> गाेंदिया झाेन : गाेंदिया, भंडारा, रामटेक.
 

काेचसाठीही खास माेहीम 
दरवर्षी दर्जेदार आणि गुणवंंत प्रशिक्षक तयार करण्यावरही अधिक भर दिला जाताेे.  २० पेक्षा अधिक प्रशिक्षक तयार हाेतात. यासाठी संघटनेच्या वतीने चाहत्यांना आवाहन केले जाते. यात सहभागींना तीन महिन्यांचा काेर्स दिला जाताे.हे पूर्ण करणाऱ्यांची बीसीसीआय नियमानुसार परीक्षा हाेते. यात प्रावीण्य मिळवणाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
 

अंतर्गत स्पर्धांचा युवा खेळाडूंना  फायदा 
विदर्भ क्रिकेट असाेसिएशनच्या वतीने दरवर्षी मंडळाच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयाेजन केले जाते. सातत्याने दरवर्षी हाेणाऱ्या या स्पर्धांचा माेठा फायदा चार झाेनमधील युवा खेळाडूंना झाला आहे.  त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून या युवांच्या गुणवत्तेला चालना मिळत आहे. तसेच मंडळाच्या वतीने या स्पर्धा आयाेजनासाठीही दरवर्षी पुढाकार घेतला जाताे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास प्रशिक्षण सेंटर तयार करण्यात आले. 
 

याेग्य प्रशिक्षणामुळेच ही माेहीम फत्ते : प्रशांत वैद्य
याेग्य प्रशिक्षण मिळाले की निश्चित केलेले ध्येय सहजपणे गाठता येते, याचा प्रत्यय आमच्या विदर्भ संघाने वेळाेवेळी आणून दिला. प्रशिक्षक चंद्रकांत यांच्यामुळे आमच्या टीमला विजयाचे व्यसन जडले आहे. त्यामुळे प्रत्येक जण मॅच विनरसाठी प्रयत्नशील असताे. हे आमच्या टीममधील  खेळाडूंनी प्रत्येक वेळी दाखवून दिले. त्यामुळे युवांसाठी राबवण्यात येणारी माेहीम फत्ते झाली, अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...