आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात थंडीच्या लाटेसह पावसाची शक्यता विदर्भ गारठला, मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यातही पारा घसरला

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
सिकर : पारा शून्याखाली. - Divya Marathi
सिकर : पारा शून्याखाली.

औरंगाबाद : उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट सुरू असून तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रालाही हुडहुडी भरली आहे. शनिवारी राज्यात नागपूर येथे सर्वात कमी ५.१ अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी पारा १० अंशांखाली राहिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पारा घसरला आहे. राज्यात या आठवड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शनिवारी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. विदर्भात थंडीच्या लाटसदृश तापमान नोंदवण्यात आले. विदर्भात या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी थंडीची लाट, तर तुरळक ठिकाणी थंडीची तीव्र लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

उत्तर भारत गारठला

 • राजस्थानात बहुतांश भागांत पारा ५ अंशाखाली.
 • राज्यातील चार जिल्ह्यांत तापमान शून्याखाली.
 • हरियाणात हिसार, नारनौलमध्ये पारा शून्याखाली.
 • दिल्लीत पारा १.७ अंशावर, ११८ वर्षांतील विक्रम.

नागपूर @ 5.1 अंश


शनिवारी नागपुरात या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात कमी ५.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी नागपुरात पाच दशकांमधील सर्वात कमी ३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नागपुरात झाली होती. गोंदिया येथे ५.२ अंश, चंद्रपूर येथे ५.४, वर्धा येथे ७.५, अकोला येथे ८.७, तर अमरावती येथे ९.२ अंश, बुलडाणा ९.५, तर यवतमाळ येथे ९.० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

प्रमुख शहरांचे किमान तापमान

 • मुंबई २०.४
 • पुणे १८.३
 • नगर १३
 • जळगाव १०.५
 • नाशिक ११.४
 • सोलापूर १९
 • उस्मानाबाद ११.९
 • औरंगाबाद १०.९
 • परभणी ११.३
 • नांदेड १४.५ अंश सेल्सियस

तापमान : प्रमुख पर्यटनस्थळाचे

 • अजिंठा -वेरूळ : १०.९
 • महाबळेश्वर : १५.०
 • कोल्हापूर : १९.७
 • पणजी : २४.१
 • रत्नागिरी : २२.६
 • अलिबाग : २०.७
 • माथेरान : २०
बातम्या आणखी आहेत...