आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार अनिल गोंडाने यांच्या निधनाने विदर्भातील संघर्षशील पँथर हरपला - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनिल गोंडाने यांच्या निधनाने विदर्भातील संघर्षशील पँथर हरपला अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अनिल गोंडाने यांना आदरांजली वाहिली. बांद्रा एम आय जी क्लब येथे रिपाइंच्या राज्य कमिटीच्या वतीने दिवंगत माजी आमदार अनिल गोंडाने यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 
 

दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे गोंडाने यांचे निधन 
माजी आमदार दिवंगत अनिल गोंडाने यांना दि. 6 सप्टेंबर पासून नागपूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार सुरू ठेवले होते. मात्र दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे प्रकृती अधिक बिघडून हृदयक्रिया बंद पडल्याने काल रात्री अनिल गोंडाने यांचे दुःखद निधन झाले. आज रात्री 8 वाजता अमरावती येथे त्यांच्या पार्थिवावर होणाऱ्या अंत्यसंस्कारास आठवले उपस्थित राहणार आहेत. 
 

त्यांची विधान परिषदेवर निवड करण्याची संधी मिळाली 
अनिल गोंडाने यांनी औरंगाबाद मध्ये शिक्षण घेतले. अमरावती आणि विदर्भात त्यांनी भारतीय दलित पँथर संघटनेचे जाळे उभारण्यात मोठे योगदान दिले. ते मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात अनेक कार्यक्रमात मला सोबत करीत असत. अत्यंत मनमिळावू असल्याने त्यांचे राज्यात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आले होते. रिपब्लिकन पक्षाशी अत्यंत एकनिष्ठ राहणारा, मनाने चांगला आणि विदर्भात सर्वांत उठून दिसणारा पँथर म्हणून त्यांची विधान परिषदेवर ६ वर्षे आमदार म्हणून निवड करण्याची संधी मला मिळाली. अनिल गोंडाने यांचे आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. अनिल गोंडाने सारखे पँथर मोहरे माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच आपले नेतृत्व उभे राहिले अशी कृतज्ञ भावना रामदास आठवलेंनी व्यक्त केली.