Flood / Video : ब्रह्मनाळमध्ये पुराच्या पाण्यात उलटलेली हीच ती बोट, या दुर्घटनेत 17 लोकांना जीव गमवावा लागला

ब्रह्मनाळमध्ये पुराच्या पाण्यात उलटलेली हीच ती बोट

मंगेश फल्ले

Aug 12,2019 12:32:03 PM IST

ब्रह्मनाळ - कृष्णेला महापूर आला आणि ब्रह्मनाळ गाव पाण्याने वेढले. पाणीपातळीही वाढू लागली. घरे,दुकाने, रस्ते, मंदिरे पाण्यात बुडू लागल्याने प्रत्येक जण जिवाच्या आकांताने गावाबाहेर काढणाऱ्या एकमेव बाेटीत बसण्याकरिता धडपड करू लागला. क्षमतेपेक्षा अधिक लाेक बाेटीतून प्रवास करू लागले असतानाच 8 आॅगस्टला एक माेठी लाट बाेटीत शिरली. बाेटीचा पंखा काटेरी झुडपात अडकल्याने बाेट कलंडली. बाेटीतील 30 ते 35 लोक पाण्यात गटंगळ्या खाऊ लागले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

X
COMMENT