भारतीय हवाई दलाच्या / भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर असे होते पाकिस्तानातील दृश्य, घटनास्थळाचे Photos आणि Video

दिव्य मराठी वेब टीम

Feb 26,2019 11:39:00 AM IST
नॅशनल डेस्क - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यानंतर तेथील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरात तीन ठिकाणी हल्ले केले. त्याच हल्ल्यानंतरचे हे फोटो आणि व्हिडिओ आहेत. पाकिस्तानी मेजर जनरल आसिफ गफूरने ते आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले. दरम्यान, भारतीय हवाई दलाने हल्ल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. तरीही या फोटो आणि व्हिडिओंबाबात भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.
X
COMMENT