Home | International | Other Country | Video game addiction is a disease

व्हिडिओ गेमचे व्यसन हा तर एक आजारच, जागतिक आरोग्य संघटनेत लवकरच मतदान; गेमिंगचा छंद दारूसारखे व्यसनच

वृत्तसंस्था | Update - May 22, 2019, 09:05 AM IST

मुलांनी किती वेळ गेम खेळावा यावर कंपन्यांचा अभ्यास सुरू

  • Video game addiction is a disease

    जिनेव्हा - व्हिडिओ गेम खेळण्याच्या विकृतीला लवकरच अधिकृतरीत्या एक आजार म्हणून मानले जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) लवकरच यावर सदस्य देशांचे मतदान घेणार आहे. गेमच्या या व्यसनामुळे मुले तसेच तरुण मानसिक अडचणींचा सामना करतात. ते तणाव आणि नैराश्यात असतात असे एमआरआय स्कॅनमधून समोर आले आहे. हे दारू किंवा अन्य नशेसारखे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी या व्यसनाला एक आजार म्हणून मान्यता दिली तर यावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ नव्या उपचारपद्धती सुरू करू शकतील.


    जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, एखादा माणूस नियमित कामे करून आणि जबाबदाऱ्या पार पाडून फावल्या वेळेत गेम खेळत असेल तर तो आजार नाही. डॉक्टरांनुसार, मुले शाळा-कॉलेजातून घरी येताच सरळ मोबाइल घेऊन गेम खेळत बसतात. म्हणून ही मुले एक प्रकारे आजारीच आहेत. हा एक असा आजार आहे की ज्यात मानसोपचार तज्ज्ञ तसेच डॉक्टर अशा दोघांचीही मदत घ्यावी लागते. आरोग्य संघटनेनुसार, १० पैकी एकास रुग्णालयात राहून सहा ते सात आठवड्यांपर्यंत उपचार घ्यावे लागतात. हा आजार जडलेले लोक काम सोडून गेमला महत्त्व देतात. याचा जीवनावर वाईट परिणाम होत असेल तर हा आजार “गेमिंग डिसऑर्डर’ मानला जाऊ शकतो. दरम्यान, गेमिंग कंपन्याही आता यावर उपाय शोधत आहेत.


    भारतात 22 कोटी गेमर्स, महिन्याला विकले जातात 60 लाख हँडसेट
    न्यूजू कंपनीनुसार, जगात गेमिंग क्षेत्राची कमाई ९७०० अब्ज रुपयांहून अधिक आहे. यात ५१ % वाटा मोबाइल क्षेत्राचा आहे. तर, गेमिंगमधून मिळणाऱ्या महसुलात भारत पहिल्या २० देशांत आहे. २०२१ पर्यंत या बाजारपेठेची कमाई ७ लाख कोटींहून अधिक होईल. जगभरात असे २.३ अब्ज गेमर्स असून २२ कोटी गेमर्स एकट्या भारतात आहेत.

Trending