आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायाच आठवड्यात मी एका जवळच्या नातेवाइकांच्या लग्नासाठी गेलो होतो, ज्यामुळे मी चार दिवस व्यग्र होतो. आमच्या कुटुंबात शेवटचे लग्न हे पाच वर्षांपूर्वी झाले होते. तिथं पाहुण्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. त्या वेळी मी एक वेगळेच सेक्शन सुरू केले, ज्यामध्ये तीन वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी एक अनोखी नर्सरी तयार केली. त्या चार दिवसांत मुलांची वाचनाची आवड आणि गोष्ट ऐकवण्याची सवय त्यांच्यात विकसित केली. कारण लग्नानिमित्त आम्ही गोष्टी सांगणारे सगळे एकत्र आलो होतो. प्रत्येक सत्रात आमच्या लक्षात आले की, लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तीही गोष्ट ऐकायला आल्या होत्या. त्यामुळे या आठवड्यातही माझ्याकडे तीच जबाबदारी होती. नातेवाइकांच्या यादीत आमच्याकडे दोन वयाेगटातील व्यक्तींची संख्या अधिक होती. यामध्ये १४ वर्षांची मुले व ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले काहीसे दुसऱ्यांवर अवलंबून असणारे वरिष्ठ होते. आम्ही दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. आमचा पहिला हेतू होता सर्वांसाठी, विशेष करून घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी आम्हाला अधिक कष्ट करावे लागतील, अधिक सहानुभूतीने काम करावे लागणार आहे आणि सोबतच त्यांची काळजी घ्यावी लागेल. दुसरे आव्हान असे होते की, आम्हाला पाच ते १४ वर्षांच्या मुलांना या कार्यात व्यग्र ठेवायचे होत व वास्तविक ध्येय म्हणजे या वयोगटातील लोकांना चांगल्या पद्धतीने जोडून घेणे. मुलांना एकत्र करून त्यांना एका खोलीत बसवून खेळांचे नियोजन केले.जसे की नेवरविंटर नाइट्स, फॉलआऊट न्यू वेगास, साऊथ पार्क : द स्टिक ऑफ ट्रूथ आणि ‘द आऊटर वर्ल्ड््स’ यासारखे खेळांचे नियोजन केले. या सर्व व्हिडिओ गेममध्ये ‘द आऊटर वर्ल्ड््स’ हा सगळ्यात महत्त्वाचा खेळ होता. आऊटर वर्ल्ड््ससारखे खेळ हा भविष्यातील एक काल्पनिक जगात आपल्याला घेऊन जातो. हा खेळ खेळताना मुले ही ‘स्टिकिंन इट टु मॅन’चा शोध घ्यायला सुरुवात करतात व हाच प्रवास तुमच्या विचारांना चालना देणारा असतो. यामध्ये तुम्ही नवीन समूहांचा आणि व्यक्तींचा सामना करावा लागतो आणि असेच पुढच्या मार्गाचा शोध घेतात. प्रत्येक जगात खलनायकाचा सामना करण्यासाठी एक खेळाडू येईल व जवळजवळ असे समान प्राणी येतील, पण काही तासांनंतर त्यांना नष्ट केल्याने हा संघर्ष थोडा शांत होईल. खेळामुळे आम्हाला मुले “एक चांगली व्यक्ती’ बनवण्यात खूप मदत झाली, जे मानवी समाजासाठी वाईट समजल्या जाणाऱ्या सर्वांचा नाश करतील. अशा प्रकारे लग्नाच्या अगोदरच्या वेळेत मुलांनी उद्धारक, ‘ईश्वर’, ‘नायक’ अशा भूमिका निभावल्या. लग्नात वृद्धांची काळजी घेण्याची कल्पना हरियाणाच्या रेवाडीजवळील शाळेच्या प्राचार्या मधू यादव यांच्या भाषणातून आली. लग्न समारंभात वयोवृद्ध एकटेपणा अनुभवत असतात. त्यांनी मुलांना असे आवाहन केले की, तुम्ही लग्नात गेला तर तिथे एखादा ज्येष्ठ नागरिक शांतपणे एकाच ठिकाणी बसून असतील तर त्याच्याशी संवाद साधा. त्या शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी किमान एक असा सामाजिक मुद्दा उपस्थित करून मुलांनी दररोज काहीतरी चांगले करावे असे आवाहन करतात. त्यांचा असा विश्वास आहे की, जर दररोज एखाद्या मुलामध्ये चांगल्या सामाजिक वर्तनाची समज विकसित झाली तर हा विचार माणूस म्हणून घडण्याच्या प्रवासात त्याला फायदेशीर ठरू शकतो. फंडा असा : व्हिडिओ गेम हा योग्य पद्धतीने खेळला तर या माध्यमातून मुलांचे व्यक्तित्व निर्माण करण्याची शक्ती असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.