Home | Maharashtra | Mumbai | Video: kangana Ranaut Blasted On Bollywood For Not Promoting Her Film Manikarnika

'मी बॉलिवूडची वाट लावेल, सर्वांचा खरा चेहरा समोर आणेल', 'मणिकर्णिका'ला प्रमोट न करणा-यांवर भडकली कंगना रनोट, सुनावले खडेबोल 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2019, 01:19 PM IST

अनेक तर माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, तरीही वाईट पध्दतीने माझ्या मागे लागले आहेत : कंगना रनोट 

 • Video: kangana Ranaut Blasted On Bollywood For Not Promoting Her Film Manikarnika

  मुंबई. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'चे सक्सेक एन्जॉय करणा-या कंगनाने बॉलिवूडला खडेबोल सुनावले आहेत. खरंतर कंगनाने मुंबईच्या गर्ल्स स्कूलसाठी चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. यावेळी मीडियाशी बोलताना तिने बॉलिवूडवर निशाना साधला. बॉलिवूडमधील जे लोक तिच्या चित्रपटाची स्तुती करत नाही त्यांच्यावर तिने निशाणा साधला.

  कंगनाने धमकी दिली की - मी बॉलिवूडची वाट लावेल
  - कंगनाने स्क्रीनिंगदरम्यान बॉलिवूडवर तिच्याविरुध्द षडयंत्राचा आरोप लावला. तिने धमकी दिली की, "बॉलिवूड ज्याप्रकारे माझ्या विरोधात षडयंत्र रचतेय आणि चुकीच्या गोष्टी करतेय, अशा लोकांवर मी दुर्लक्ष करत राहायचे. मग ते सेक्सिजम असो, नेपोटिज्म असो किंवा मग फीसमध्ये असमानता असो. पण आता मी लोकांच्या मागे लागणार आहे आणि त्यांची वाट लावणार आहे. आता मी एकाएकाचा खरा चेहरा समोर आणेल आणि विश्वास ठेवा सर्व अडचणीत सापडतील." पण कंगनाने यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही.

  या लोकांना लाज वाटत नाही : कंगना
  - कंगनाने बॉलिवूडच्या सेलेब्सवर राग काढत म्हटले की, "मी नपोटिज्मविरुध्द आवाज उठवला म्हणून हे सर्व गँग बनवून बसले आहेत. लहान मुलांच्या 60 विद्यार्थ्यांच्या क्लासरुममध्ये जेव्हा एका मुलाविरुध्द 59 मुलं उभे राहतात. तसा व्यवहार बॉलिवूडमध्ये माझ्यासोबत केला जातो. आणि ते फक्त मला घाबरवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी. अशा लोकांना लाजही वाटत नाही. काही तर माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, तरीही वाईट प्रकारे माझ्या मागे लागले आहेत. मला तर अशा लोकांसोबत कामही करायचे नाही आणि हे मी त्यांच्यासमोर बोलते."


  अभिनयाच्या बाबतीत हे लोक मला काय सपोर्ट करतील
  - कंगनाने बॉलिवूड स्टार्सवर निशाना साध म्हटले की, "अभिनयाच्या बाबतीत हे लोक काय मला सपोर्ट करतील? मी स्वतः 3-4 वेळा नॅशनल अवॉर्ड जिंकले आहे." कंगनानुसार, फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी तिच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाला प्रमोट केले नाही आणि तिला याचा काही फरक पडत नाही. ती म्हणते की, मी वयाच्या 31 व्या वर्षी फिल्ममेकर बनले. यामुळे बॉलिवूडच्या लोकांनी माझी फिल्म प्रमोट करणे किंवा न करण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही.

Trending