Home | National | Madhya Pradesh | #WATCH: Man claiming to be a brother in law of Chief Minister Shivraj Singh Chouhan created ruckus near Vidhan Sabha in Bhopal

'मुख्यमंत्री माझे मेहुणे आहेत, गाडी कशी सोडत नाहीस?' पोलिसांना दिला दम; सोबतच्या महिलेला म्हणाला- 'जरा चपलेनं सोय बघ बरं याची!'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 12:24 PM IST

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर गुरुवारी ट्रॅफिक पोलिस शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर चेकिंग करत आहेत.

 • #WATCH: Man claiming to be a brother in law of Chief Minister Shivraj Singh Chouhan created ruckus near Vidhan Sabha in Bhopal

  भोपाळ - निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर गुरुवारी ट्रॅफिक पोलिस शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर चेकिंग करत आहेत. यातील एक पॉइंट सुबेदार दीपांकर स्वर्णकार यांच्या नेतृत्वात जेल रोडवरील होमगार्ड लाइनजवळही होता. दुपारी सव्वा 12 वाजले होते. तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांतील शिपायाने एमपी 17 बी 8040 नंबरची स्कॉर्पिओ गाडी हात दाखवून थांबवली.

  ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसलेली व्यक्ती म्हणाली- सीएम माझे साले आहेत.
  शिपाई म्हणाला- ही गोष्ट तुम्ही गाडीतून उतरून साहेबांना सांगा.
  यामुळे नाराज व्यक्तीने गाडीतून उतरताच शिपायाचा हात पकडला आणि सोबतच्या महिलेला म्हणाला- काढ जरा चप्पल!
  हे पाहून चेकिंग करणारा पूर्ण स्टाफ तेथे आला आणि वादाला सुरुवात झाली. जवळजवळ अर्धा तास हे सुरू होते.

  वाद घातल्यावर चौकशी न करताच धमकावणाऱ्याला जाऊ दिले...

  घटनास्थळी उपस्थित एका पत्रकाराने फोन करून एएसपी ट्रॅफिक अरविंद दुबे यांना पूर्ण घटना सांगितली. ते म्हणाले- मी डीएसपींना पाठवतो. डीएसपी मधुकर चौकीकर जागेवर पोहोचले तेव्हाही वाद सुरूच होता. डीएसपींनी दोन्ही पक्षांची समजूत घातली आणि मग कोणतीही कारवाई न करता प्रकरण गुंडाळले. त्या नंबरची गाडी राजेंद्रसिंह चौहान नावाने रजिस्टर्ड असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रश्न विचारण्यासाठी एएसपी ट्रॅफिक यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही. डीआयजी धर्मेंद्र चौधरी म्हणाले की, एसपी हेडक्वार्टर धर्मवीर यादव यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. यानंतर पुढील कारवाई केली जाईल.


  काय म्हणाले मुख्यमंत्री?
  या प्रकरणावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, "त्याचं असं आहे की, माझ्या कोट्यवधी बहिणी आहेत आणि मी कित्येकांचा मेहुणा आहे. कायदा आपले काम करेल."

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा Video व आणखी Photos...

 • #WATCH: Man claiming to be a brother in law of Chief Minister Shivraj Singh Chouhan created ruckus near Vidhan Sabha in Bhopal
 • #WATCH: Man claiming to be a brother in law of Chief Minister Shivraj Singh Chouhan created ruckus near Vidhan Sabha in Bhopal
 • #WATCH: Man claiming to be a brother in law of Chief Minister Shivraj Singh Chouhan created ruckus near Vidhan Sabha in Bhopal

Trending