आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकटॉकवर तरुणीचा व्हिडिओ; तिघांना अटक, जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील एका रुग्णालयात काम करणाऱ्या तीन तरुणांनी सोबत काम करणाऱ्या एका तरुण परिचारिकेवर अश्लील शेरेबाजी करणारा २० सेकंदांचा व्हिडिओ तयार केला. तो टिकटॉकसह स्वत:च्या व्हाॅट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला. या प्रकरणी तरुणीने फिर्याद दिल्यानंतर रविवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणी गौरव प्रकाश सुरळकर (१९), प्रतीक प्रमोद पाटील (१९) व अमीर पिरखा तडवी (१९, तिघे रा. श्रीकृष्ण पोलिस कॉलनी, निमखेडी शिवार) या तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून हे तिघे परिचारिकेची छेड काढत होते. २८ डिसेंबर राेजी सकाळी ८ वाजता या तिघा तरुणांच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसवर एक २० सेकंदांचा व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्यांनी परिचारिकेच्या संदर्भात अश्लील शेरेबाजी केली होती. हा व्हिडिओ टिकटॉक या सोशल साइटवरदेखील अपलोड केला होता. या तिघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक अकबर पटेल तपास करीत आहेत.