आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर बाजारात तान्ह्या बाळाला हवेत फेकत होता माथेफिरू कपल, अमानुषवृत्तीचा कळस दाखवणारा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - क्वालालंपूरच्या एका बाजारात पर्यटनासाठी आलेल्या कपलचे कृत्य पाहून सर्वांना धक्का बसला. टूरिस्ट प्लेसवर या कपलने अचानक एका तान्ह्या बाळाला त्याच्या पंजांपासून पकडले आणि जोर-जोरात हवेत फेकण्यास सुरुवात केली. 90 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी एकानंतर एक कधी पाय धरून तर कधी हात धरून त्या बाळाला अतिशय अमानुष पद्धतीने झटकले. याच शनिवारी हा व्हिडिओ Zayl Chia Abdulla नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या कृत्यावर संताप उमटला.


पैश्यांसाठी केले असे कृत्य...
व्हिडिओमध्ये दिसून येते की एक टूरिस्ट लहानग्याला हवेत फेकत आहे. तर त्याच्या शेजारीच बसलेली महिला लोकांकडून पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान अनेक जणांनी त्याकडे पाहूनही दुर्लक्ष केले. त्यांना बाळाची काहीच चिंता वाटली नाही. तर काहींनी या कपलला अडवून जाब विचारला आणि त्यांचा अमानुष खेळ तेथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही, जोडप्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून कपलला अटक करण्यात आली आहे. मात्र, ते बाळ नेमके कुणाचे होते हे अद्याप कळालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...