आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Video Of Daughter Giving Royal Enfield As Surprise Gift To Father Goes Viral, Read All

मुलीने आपल्या पहिल्या कमाईतून वडिलांना दिले असे Gift, पाहून तेही गहिवरले; म्हणाले- शाब्बास बेटा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - मुलगाच हवा या हट्टामुळे आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला की नाक मुरडला जातो. मुलगा झाला म्हणजे, लाडू आणि चमचमीत मिठाई वाटप करायची आणि मुलगी झाली तर जिलेबी... असे चित्र आजही पाहायला मिळते. अशा मानसिकतेच्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ इतका सुंदर आहे, की पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही.


नेमके काय आहे या व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या डॅडीला सरप्राइझ गिफ्ट देताना दिसून येते. तिने आपल्या आई आणि भावासह वडिलांना डोळ्यांवर पट्टी बांधून एका ठिकाणी नेले. यानंतर हळूच डॅडीच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. त्यांच्यासमोर एक रॉयल एनफील्ड बुलेट (गनमेटल ग्रे) उभी होती. वडिलांना कळले होते. तरीही त्यांनी खात्री पटवून घेण्यासाठी हळूच मुलीला विचारले, बेटा हे काय? मुलीने सांगितेल हे तुमचे सरप्राइझ गिफ्ट... वडिलांना काय करावे सूचेनासे झाले... काही न बोलता त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी लगेच आपल्या मुलीला घट्ट मिठी दिली. वडिलांना आनंदी पाहून मुलीच्याही डोळ्यांत पाणी आले. तिनेही वडिलांना घट्ट धरले होते. मुलगी असण्याचा खरा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. मग काय... मुलीने डोळे पुसत वडिलांना चावी दिली आणि वडील भुर्रर... निघाले. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि नयनात पाणी होते...


कोण आहेत ही मंडळी?
व्हिडिओमध्ये दिसणारे अंकल तामिळ चित्रपटातील चरित्र कलाकार आणि अभिनेते एम.एस. भास्कर आहेत. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ते स्टेजवर नाटक सुद्धा सादर करतात. त्यांना एक आणि एक मुलगी आहे. व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसते ती त्यांचीच मुलगी ईश्वर्या आहे. ती एक डबिंग आर्टिस्ट आहे. तसेच 1 जानेवारी 2018 रोजी तिने आपल्या वडिलांनी ही बाइक गिफ्ट केली होती. तर मुलाचे नाव आदित्य असून भास्कर त्याला त्याला तामिळी चित्रपटात लाँच करण्याची तयारी करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...