Home | International | Other Country | video of four lions take over busy road in kruger national park south africa

Viral Video: जेव्हा राजेशाही थाटात सिंहांनी केला ट्रॅफिक जॅम; हालण्याची नव्हती हिंमत कुणाची!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:03 AM IST

हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील क्रूजर राष्ट्रीय अभयारण्यातील आहे.

  • इंटरनॅशनल डेस्क - सिंहांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सिंहांच्या एका समूहाने हायवेवर ट्रॅफिक जॅम केला. हा व्हिडिओ त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका युझरने ट्वीट केला आणि तो सध्या इंटरनेटवर गाजतोय. हा व्हिडिओ 'Just your average traffic jam in South Africa' अर्थात दक्षिण आफ्रिकेतील एका सामान्य ट्रॅफिक जॅम असे म्हणत शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील क्रूजर राष्ट्रीय अभयारण्यातील आहे. व्हिडिओ खरा असला तरीही तो जुना आहे. परंतु, लोकांना तो खूप आवडत आहे. काही लोक भीती तर काही राजेशाही थाट पाहण्यासाठी पुन्हा-पुन्हा हा व्हिडिओ पाहून मित्र-परिवाराला सुद्धा दाखवत आहेत.

Trending