आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Video Of How Anupam Kher Was Used To Get Make Up To Became Manmohan Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिडिओत दिसले अनुपम खेर यांना कसा दिला जायचा मनमोहन सिंह यांचा लूक, स्वतः शेअर केला Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - डायरेक्टर विजय गुट्टे यांचा 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपट 11 जानेवारीला रिलीज होत आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका केली आहे. अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मनमोहन सिंह यांचा लूक त्यांना कसा दिला जात होता हे दिसत आहे. या मेकअरसाठी त्यांना 2 तास लागायचे. 


रिलीजपूर्वीच वादात अडकला चित्रपट 
- ट्रेलर रिलीजपासून हा चित्रपट वादात अडकला आहे. चित्रपटाच्या प्रोमोवर बॅन लावण्याची मागणी केली आहे. त्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. पण कोर्टाने मात्र स्थगितीस नकार दिला आहे. 
- दरम्यान वादात अडकलेला हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची इच्छा अनुपम खेर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, हा असा चित्रपट आहे जो मॉर्डन इंडियाचे राजकारण दाखवतो. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक तसेच कलाकारही उत्कृष्ट आहेत. 


काय म्हणाला अक्षय.. 
अक्षय खन्ना म्हणाला की, हा वाद नसून चक्चा आहे. चर्चा व्हायलाच हवी. मुद्दा आपल्या बाजुचा असो की विरोधातील, त्यावरील चर्चा मान्य केली पाहिजे. हा असा चित्रपट आहे जो सध्याच्या काळातील नेत्यांवर तयार करण्यात आला आहे. सत्य घटनांवर आधारित आहे आणि लोक याबाबत चांगल्या रितीने जाणतात. 


आणखी एक याचिका 
दिल्लीची फॅशन डिझायनर पूजा महाजनने चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. निर्मात्यांना भारतीय संविधानाचा अपमान करण्याचा काहीही अधिकार नाही, असे याचिकेत म्हटले आहे. निर्मात्याने स्वतःसाठी चित्रपट बनवला आहे, असे वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. लोकांना उत्साहीत करण्यासाठी विनाकारण पंतप्रधान पदाची बदनामी केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.