आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोच्ची - केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये अलेक नागरिकांचे जीव संकटात अडकले. या सर्वांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. राज्यात या पुरामुळे सुमारे 200 हून अधिक जणांनी प्राण गमावले. पण सैनिकांनी जर स्वतःचा जीव धोक्यात घालत मदतकार्य केले नसते तर हा आकडा बराच वाढलेला असता. लष्कर आणि NDRF चे जवान दिवसरात्र बचाव कार्य राबवत आहेत. या बचावकार्यादरम्यानचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून जवानांविषयी प्रत्येकाच्या मनात आदर अधिक वाढेल.
महिलांसाठी पाण्यात वाकून पाठिची तयार केली पायरी
व्हिडिओमध्ये दिसतेय की, एनडीआरएफची बोच नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आलेली आहे. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांना बोटमध्ये बसायचे आहे पण पाण्याची खोली अधिक असल्याने महिलांना बोटमध्ये स्वार होता येत नव्हते. त्याचवेळी एनडीआरएफचा एक जवान पाण्यात खाली वाकला आणि त्याने स्वतःच्या शरिराची जणू पायरी तयार केली. त्यानंतर महिला एकापाठोपाठ एक त्याच्या पाठिवर पाय ठेवून बोटमध्ये स्वार झाल्या. यावेळी जवानाच्या नाका तोंडात पाणी जात होते. पण त्याने त्याचे कर्तव्य सोडले नाही. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.