आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिओ - प्रेमात दगा-फटका मिळाल्यानंतर मनावर काय परिणाम होतो याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने आपल्या पती आणि त्याच्या प्रेयसीची धो-धो धुलाई केली. सुरुवातीला पती आणि त्यानंतर त्याच्या प्रेयसीला पाडून चोप दिला. एवढेच नव्हे, तर मिळेल त्या खुर्च्या घेऊन सुद्धा त्या दोघांवर भिरकावल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर पसरवला जात आहेत.
ऑफिसच्या बहाण्याने गर्लफ्रेंडसोबत पित होता दारू...
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ प्रत्यक्षात ब्राझीलचा असून तो गतवर्षी टिपण्यात आला आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या एका गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीसोबत दारु पित बसला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आपल्या पत्नीला चीट करून प्रेयसीची भेट घ्यायचा. एक दिवस प्रेयसी थेट घटनास्थळी पोहोचली आणि पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडले. यानंतर संतप्त पत्नीने सुरुवातीला पतीला तोंडावर पंच मारला. यानंतर तरुणीचे केस धरून टेबलावर आपटले. इतक्यातही तिचा राग शांत झाला नाही. तिने तरुणीने जमीनीवर आपटून लाथा-बुक्क्या मारल्या. जवळपासचे लोक त्या महिलेला अडवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ती कुणालाही सांभाळली जात नव्हती. काही सेकंदांतच तिने तेथील खुर्ची उचलून भिरकावली. या व्हिडिओतील व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.