आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या एका गोष्टीमुळे नाराज पत्नी निघाली आत्महत्या करायला, विजेच्या टॉवरवर चढून मोठ-मोठ्याने म्हणत होती एकच गोष्ट, 1 तास सुरू होता हाय व्होल्टेज ड्रामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोतिहारी(बिहार)- पतीवर नाराज झालेली पत्नी आत्महत्या करण्यासाठी विजेच्या टॉवरवर चढली, याची सुचना ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. अंदाजे 1 तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. ती आपल्या पतीवर मारहाणीचा आरोप लावत होती आणि मला घरी नको घेऊन जाऊस असं सारखं म्हणत होती. पोलिसांच्या खूप प्रयत्नानंतर महिला खाली उतरली. पोलिसांनी सांगितले की, महिला मानसिक रोगी असल्यामुळे तिने हे केले.

 

राकेश सहनी उर्फ गुड्‌डूची पत्नी खुशबूने 11 लाख व्होल्ट विजेच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला टॉवरवर चढताच शेकडो ग्रामस्थांनी टॉवरकडे धाव घेतली. काही लोकांनी महिलेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. शेवटी ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला.


दोन वर्षांपूर्वी झाले होते लव्ह मॅरेज
राकेश आणि खुशबूने दोन वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केले होते, आणि त्यांना नऊ महिन्यांचा मुलगादेखील आहे. त्यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होता. राकेश ओडिसामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता, खुशबूने त्याच्या सोबत जाण्याचा हट्ट केला होता, पण राकेश तिला नेत नव्हता आणि म्हणूनच नाराज होऊन ती टॉवरवर चढली.

बातम्या आणखी आहेत...