आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे होणार व्हिडिओ शुटींग, परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वतीने प्रात्याक्षिक परीक्षांना जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी वेगवेगळे प्रयोग सीबीएसई करत असून, यंदाच्या परीक्षेपासून नियम अधिक कडक करत परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा घेतांना त्याचे व्हिडिओ शुटींग केले जाणार आहे. येत्या जनेवारीत होणाऱ्या सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षेत कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी व्हिडिओ शुटींग केले जाणार आहे. एवढेच नाही तर बाहय परीक्षक निरीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या सूचना सीबीएसईने शाळांना दिल्या आहेत.
तसेच जो कुणी परीक्षेतील गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आणून देईल, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बारावीचे जे विद्यार्थी प्रायोगिक परीक्षेला बसणार नाही, त्यांना परीक्षेत अनुपस्थित मानले जाईल. बोर्डाने दिलेल्या नियमावलीत म्हटले आहे की, ज्या शाळेत प्रात्याक्षिक परीक्षेत गैर प्रकार झाल्याचे समोर येईल. त्यांची चौकशी केली जाईल. याबरोबरच परीक्षा दिलेल्या परीक्षार्थी त्यांची उपस्थितीची देखील तपासणी करुन शाळेवर कारवाई करण्यात येईल. व्हिडिओ शुटींगमुळे गैरप्रकार करणाऱ्यांना पकडण्यास सोपे होईल. असेही बोर्डाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...