आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Video Viral, Deepak Thakur Crossing River By Boat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस 12' मधून बाहेर पडल्यानंतर गावात पोहोचला दीपक ठाकुर, नावेतून पार करावी लागली नदी, व्हिडिओ होतोय व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'बिग बॉस 12' मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसलेला भोजपुरी सिंगर दीपक ठाकुरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दीपक जेव्हा 'बिग बॉस' पुर्ण करुन मुजफ्फरपुर जिल्ह्यातील आपल्या गावात पोहोचला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दीपक नावेने नदी पार करताना दिसतोय. हा व्हिडिओ स्वतः दीपकने यू-ट्यूबवर लाइव्ह केला होता आणि तो 4 महिन्यांनंतर गावी जात आहे आणि आता येथील वातावरण असे आहे असे त्यांनी सांगितले. 


एका दूस-या व्हिडिओमध्ये श्रीसंथवर बनवलेले गाणे गाताना दिसला दीपक 
- दीपकचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो आपल्या गावातील लोकांसोबत दिसत आहे. दीपक स्वतःच्या गावातील लोकांसोबत खुप आनंदी दिसतोय. या व्हिडिओमध्ये दीपक माजी क्रिकेटर श्रीसंथवर बनवलेले गाणेही गाताना दिसतोय. 'गँग्स ऑफ वासेपुर 2' सारख्या चित्रपटांमध्ये सिंगिंग केलेला दीपक 'बिग बॉस 12' मध्ये पहिल्या दिवसांपासून कंटेस्टेंट म्हणून आला आणि ऑडियन्सला खुप एंटरटेन केले. तो टॉप 3 फायनलिस्टमध्ये पोहोचला होता. पण ऐनवेळी 20 लाखांची सूटकेस घेऊन त्याने गेम सोडण्याचा निर्णय घेतला.