आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Video Viral Of Physical Exploitation Of School Girls In Coaching Class Azamgarh UP

कोचिंग क्लासमध्ये मुलींना Kiss करून शिक्षकाने बनवले अश्लील Video, ब्लॅकमेल करून करायचा मनमानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझमगड, यूपी - कोचिंगच्या आडून एका शिक्षकाने मर्यादा विसरून गुरू आणि शिष्याच्या नात्याला कलंकित केले आहे. कोचिंगच्या आडून तब्बल 25 हून जास्त विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य करताना शिक्षकाने व्हिडिओ बनवले. व्हिडिओमध्ये शिक्षक विद्यार्थिनीला किस करताना दिसत आहे. यानंतर अनेकींना ब्लॅकमेल करून नराधम शिक्षकाने मनमानी सुरू केली. ही घटना उजेडात आल्यावर आरोपी शिक्षक फरार झाला आहे.

 

असे आहे प्रकरण
- पोलिसांच्या माहितीनुसार, जमालपुर बेलखेडाच्या सिरसाल गावातील चंद्रशेखर यादव हा गणिताचे कोचिंग क्लास चालवतो. तो आधी शेख रहमत माध्यमिक कॉलेजमध्ये शिक्षक होता. तथापि, कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे की, काही दिवसांपूर्वी त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. 

- आरोपी शिक्षक संध्याकाही 5 वाजता कोचिंग घ्यायचा. तो नेहमी एक-दोन विद्यार्थिनींना टिप्स देण्याच्या बहाण्याने क्लासनंतर थांबवून घ्यायचा. यानंतर तो त्यांच्यासोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ शूट करून घ्यायचा. विद्यार्थिनींच्या मते, शिक्षक त्यांना भीती घालून, दमदाटी करून गप्प करायचा.
- यादरम्यान काही विद्यार्थ्यांना या प्रकाराची माहिती कळली. त्यांनी लपून या शिक्षकाचा व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल केला. व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाचा शोध सुरू असून त्यासाठी छापेमारी केली जात आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटेज व व्हायरल व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...