दिव्य मराठी वेब टीम
Mar 24,2019 01:50:00 PM IST
गॅझेट डेस्क - व्हिडीओकॉन कंपनीने 2017 मध्ये 5 स्टार असलेला आपला पहिला हायब्रिड सोलर एअर कंडीशनर लॉन्च केला होता. हो AC पूर्णपणे हायब्रिड आणि सौरऊर्जेवर चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या ACमुळे विजेच बील येणार नाही. यामुळे अशा उन्हाळ्याच्या दिवसात हा एसी आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
सोलर प्लेटद्वारे मिळते ऊर्जा
> कंपनीने या AC मध्ये सोलर पॅनल प्लेट आणि DC ते AC कन्व्हर्टयर दिले आहे. हे पॅनल कोणत्याही हवामानात काम करतात आणि याचा मेंटनंस खर्च देखील कमी आहे. कंपनीने 1 टन आणि 1.5 टन AC अशा दोन वेगवेगळ्या कॅपेसिटीमध्ये हे एअर कंडीशनर काढले आहेत..
किती असेल किंमत
> व्हिडीओकॉनने 1 टेन एअर कंडीशनरची किंमत 99 हजार आणि 1.5 टन AC ची किंमत 1.39 लाख रुपये आहे. कंपनी या किंमतीत सोलर पॅनेल प्लेट आणि DC तो AC कन्वर्टर देते. फक्त उन्हात हा AC काम करतो. रात्रीच्या वेळी हा AC काम करत नाही. यासाठी तुम्हाला 1 लाख रूपये खर्च करून एक बॅटरी खरेदी करण्याची आवश्यकता आहे. या बॅटरीमुळे तुम्हाल रात्रीही एसीच्या थंड हवेचा अनुभव घेता येईल. कंपनीचे म्हणणे आहे की, इतका खर्च केल्यानंतर तुम्हाला 25 ते 30 वर्षांपर्यंत फ्रीमध्ये एसीची थंडी हवा घेऊ शकतात.