आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून जेव्हा अटलजींनी होळी उत्सवात केला डान्स, गुडघेदुखीतही धरला ठेका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळीच्या उत्सवात कार्यकर्त्यांबरोबर नृत्य करताना वाजपेयी. - Divya Marathi
होळीच्या उत्सवात कार्यकर्त्यांबरोबर नृत्य करताना वाजपेयी.

नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय राजकारणाच्या इतिहासात कधीही भरून न निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे. अटलबिहारी वाजपेयी ही सामान्यांचे नेते होते, असे म्हटले जाते. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये वाजपेयी नेहमी रमतदेखिल असायचे. तसेच सामान्य कार्यकर्त्यांचा शब्दही त्यांच्यासाठी महत्त्वाचा असायचा. त्यांच्या अशाच काही आठवणींचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत. एएनआयने त्यांच्या अर्काईव्हमधून हे व्हिडिओ समोर आणले आहे. 


होळी उत्सवात डान्स..
अटलबिहारी वाजपेयी यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. गुडघेदुखीमुळे त्यांना नीट चालताही येत नव्हते. पण तरीही होळी उत्सवामध्ये ते कार्यकर्त्यांचा आग्रह मोडत नव्हते. अशाच एका होळी उत्सवात कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी वाजपेयींनी अत्यंत उत्साहात डान्स केला होता. त्याची झलक पाहुयात...

ANI ARCHIVES: #WATCH Former PM #AtalBihariVaajpayee dancing at a program. pic.twitter.com/HXMBiCB18h

— ANI (@ANI) August 16, 2018

जेव्हा बालवीराला उचलले

2003 साली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शौर्य पुरस्कार विजेत्या बालवीरांबरोबर भरपूर मस्ती केली होती. यावेळी त्यांनी एका बालवीराला उत्साहात उचलूनही घेतले होते. या आठवणीचा व्हिडिओदेखिल एएनआयने समोर आणला आहे. पाहुयात ही आठवण...

ANI ARCHIVES #WATCH Former PM #AtalBihariVajpayee lifts a young bravery award winner at the 2003 National Bravery Award ceremony. pic.twitter.com/oVYV47D4ov

— ANI (@ANI) August 16, 2018

 

बातम्या आणखी आहेत...