आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेश, मिझोरममध्ये मतदानाला सुरुवात; 100 हून अधिक मतदान केंद्रांवर EVM बिघडल्याच्या तक्रारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ / ऐझॉल - मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. या दरम्यान एकट्या मध्य प्रदेशातच तब्बल 100 हून अधिक ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे, राजधानी भोपाळच्या इमली आणि शाहपुरा येथे मतदानाला 20 मिनिटे उशीराने मतदान सुरू झाले. तर सतना भिंड, ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन आणि खरगोनच्या अनेक ठिकाणी मतदानाला अर्धा तास विलंब झाला. कुठल्याही ठिकाणी ईव्हीएम बिघडल्यास 30 मिनिटांच्या आत ते दुरुस्त केले जात आहे असा दावा राज्य निवडणूक आयुक्त बीएल कांताराव यांनी केला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत येथे 28% मतदान झाले आहे.

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथे मतदान केले. मत टाकण्यापूर्वी त्यांनी नर्मदा नदी आणि कुलदेवीच्या मंदिरात पूजा-अर्चना केली. सोबतच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कमलनाथ यांनी छिंदवाडा येथील हनुमान मंदिरात आरती केली. त्यानंतर मतदानाचा हक्का बजावला. तर दुसरीकडे मिझोरमच्या 40 विधानसभा जागांसाठी देखील मतदान झाले. 

 

कोण किती जागांवरून लढतेय...
मध्य प्रदेशात भाजप सर्वच 230 जागांवरून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने एक जागा आघाडीतील पक्ष लोकशाही जनता दलासाठी सोडून 229 जागांवर आपले उमेदवार उतरवले. आम आदमी पार्टी आणि सपाक्स असे पक्ष मध्य प्रदेशात पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. यात आपने 207, सपाक्सने 109, बसपने 227, गोंगपा 73 आणि समाजवादी पक्षाने 52 जागांसाठी उमेदवार दिले आहेत.

 

मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान
मिजोरममध्ये 40 जागांसाठी 8 राजकीय पक्षांनी एकूण 209 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यात सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट सर्वच 40 जागांवर लढवत आहे. यानंतर भाजप 39, नॅशनल पीपल्स पार्टी 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर नशीब अजमावत आहे. निवडणुकीच्या रिंगणात 8 राजकीय पक्ष असले तरीही सद्यस्थितीला काँग्रेस, एमएनएफ आणि मिझोरम पीपल्स पार्टी या तीनच पक्षांचे आमदार आहेत. यात काँग्रेसकडे सर्वाधिक 34 आमदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...