आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली 'दिव्यमराठी' मतदान जागृतीची शपथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : बलशाली महाराष्ट्रासाठी मतदानाची प्रतिज्ञा या “दिव्य मराठी’च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात कला कट्टा येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदानाची शपथ घेण्यात आली. या वेळी भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, भारतीय योग संस्थानचे डॉ. उत्तम काळवणे, इरा स्कूलचे संचालक डॉ. सतीश गोरे यांच्यासह राधाकृष्ण कॉमेडी क्लब, लायनेस क्लब ऑफ औरंगाबाद मेनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.   

दिव्य मराठीची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. माझ्यासारख्या बांधवांमुळे या देशात लोकशाही आहे. हा देश कोणत्याही नेत्याचा नाही. तो तुमचा आणि माझा आहे. या देशाची अंतिम सत्ता जनतेची आहे. मी मतदार असल्याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा हक्क मी बजावणार आहे. मी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा नाही. गणरायांच्या साक्षीने आम्ही प्रतिज्ञा करतो की या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारच. त्यातच माझे आणि माझ्या देशाचे सौख्य सामावलेले आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.

बातम्या आणखी आहेत...