आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेससाठी काश्मीर राजकीय मुद्दा पण आमच्यासाठी अखंड भारत बनवण्याचा संकल्प - अमित शाह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (22 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावळे कलम 370 मधील बदल आणि जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयावर भाष्य करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. या निवडणुकीत आमचेच सरकार येणार आणि निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील अशी घोषणा अमित शाहांनी केली.   

पंडीत नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित - अमित शाह

या वेळी कलम 370 रद्द करण्याचा निर्णयावर विरोध केल्यामुळे काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, की 'राहुल गांधी आणि काँग्रेससाठी काश्मीर राजकीय मुद्दा आहे. पण आम्हाला यात देशभक्ती दिसते. काँग्रेसने काश्मीरमध्यील नरसंहार झाल्याचे खोटे पसरवले पण तेथे एकही गोळी चालवली गेली नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत आपण कोणाला साथ द्यायची हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे.' तसेच पंडीत नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मु्द्दा तसाच राहिल्याचे अमित शहांनी म्हटले. 
 

विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी कलम 370 महत्त्वाचा मुद्दा असेल

अमित शाहांनी आपल्या भाषणात,'कुछ भी हो, कुछ भी न हो, जीत हमारी पक्की है' असे म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील निवडणुकीत भाजपसाठी कलम 370 महत्त्वाचा मुद्दा असेल, कारण पंतप्रधान मोदींनीही नाशिकमधील सभेत कलम 370 च्या मुद्दा लावून धरला होता.  
 

अमित शाह यांच्या भाषणातील काही मुद्दे
> महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार
> कुछ भी हो, कुछ भी न हो, हमारी जीत पक्की है 
> काश्मीरचा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता.
> आमच्या तीन पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले. 
> काश्मीर काँग्रेससाठी राजकीय मुद्दा असू शकतो, आमच्यासाठी अखंड भारत बनवण्याचा संकल्प. 
> राहुल गांधी म्हणतात, कलम 370 चा मुद्दा राजकीय आहे, मात्र ते राजकारणात नवीन आहेत.
> कलम 370 मुळे काश्मीरात दहशतवाद फोफावला.
> कलम 370 हटवल्याने काश्मिरींना न्याय मिळाल. 
> पंडीत नेहरूंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे. 
> कलम 370 हटवल्यापासून काश्मिरात एकही गोळी चालवावी लागली नाही किंवा एकही मृत्यू झाला नाही.
> कलम 370 हटवायला शरद पवार यांचा विरोध आहे की पाठिंबा ते त्यांनी स्पष्ट करावे.
> काँग्रेस आणि राष्ट्रवादी कलम 370 हटवण्याला विरोध करत आहे.