पक्षांतर पंधरवाडा / महाराष्ट्रात महापक्षांतर यात्रा वेगाने; सत्ताधारी पक्षात ‘यात्रेकरूं’ची जमलीय मांदियाळी

मराठवाडा :  पक्षांतरामुळे अस्वस्थ काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे युतीचे आव्हान

विशेष प्रतिनिधी

Sep 22,2019 10:41:52 AM IST

दिव्य मराठी - जम्बाे मेगाभरती हे यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्यं. ज्यांना जनता कंटाळली हाेती, तीच नेतेमंडळी पुन्हा मतदारांसमाेर उभी आहे, फक्त त्यांनी टाेप्या बदलल्या आहेत. ज्यांच्यावर आजवर टीका केली त्यांनाच सत्ताधाऱ्यांनी कवटाळले आहे. या राजकीय गुद्दागुद्दीत मतदाराला मात्र गृहीत धरलं जातंय. आता मतदारराजा आता हे सहन करणार नाही. पुढचा एक महिना तरी ताे पंचाच्या भूमिकेत असेल. म्हणूनच राजकीय आखाड्यात काेणाला काैल द्यायचा, हे ताेच ठरवणार आहे.

कुणी सत्तेच्या लालसेपाेटी, तर कुणी कारवाईतून वाचण्यासाठी सत्ता पक्षाचे झेंडे हाती घेत आहे. त्यामुळे भाजप-सेनेत तुंबळ गर्दी वाढली असून तिथे निष्ठावंतांचीच गळचेपी हाेऊ लागली आहे. परिणामी या पक्षांत बंडाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता आमच्या पक्षातही इनकमिंग वाढेल, असा काँग्रेस- राष्ट्रवादीचा दावा आहे.

मराठवाडा : पक्षांतरामुळे अस्वस्थ काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे युतीचे आव्हान

औरंगाबाद - २००९ पर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मराठवाड्यात २०१४ च्या निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. तेव्हापासून मागील पाच वर्षांत या सत्ताधारी पक्षाच्या यशाची चढती कमान कायम राहिली. लाेकसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत अनेक संस्थांवर वर्चस्व प्राप्त केले. सत्तेच्या जाेरावर काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक छाेट्या- माेठ्या नेत्यांना आकर्षित करून भाजपने अल्पकाळात हे यश प्राप्त केले. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीपूर्वी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मराठवाड्यात पक्षांतराचे लाेण सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर व उस्मानाबादमधील ज्येष्ठ नेते डाॅ. पद‌्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा विद्यमान आमदार राणा जगजितसिंह यांनी नुकताच अनुक्रमे शिवसेना व भाजपत प्रवेश केला. क्षीरसागर यांची तर शिवसेनेने कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णीही लावली. आैरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लाेड येथील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लाेकसभेच्या वेळी बंडखाेरी केली हाेती. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या नेत्यांसाेबत त्यांच्या समर्थकांनीही पक्षांतर केले आहे. आपसूकच या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थाही भाजप-शिवसेनेच्या पंखाखाली आल्यात.


एकूणच, लाेकसभेतील अपयश व पक्षांतराच्या धक्क्यांनी गलितगात्र झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आता आगामी विधानसभा निवडणुकीत आहे त्या जागा वाचवण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे या मराठवाड्यातील आघाडीच्या नेत्यांवर या भागातील यशापयशाची भिस्त आहे. आजघडीला चव्हाण वगळता मराठवाड्यात काँग्रेसकडे बडा नेता नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या भागाचा दाैरा करून नैराश्य आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असून त्यात त्यांना यशही येत आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आता काँग्रेस-राष्ट्रवादीसमाेर नवीन आव्हान उभे केले आहे. आैरंगाबादेत एमआयएमने गेल्या विधानसभा निवडणुकीत व नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलाच हादरा दिला. बीड, नांदेड या जिल्ह्यांतही एमआयएमची ताकद आहे. त्यामुळे केवळ विराेधकांनाच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांनाही वंचित आघाडी व एमआयएमची धास्ती आहे.

चर्चेतील नेते :

> अशाेक चव्हाण (भाेकर)
> जयदत्त क्षीरसागर (बीड)

> पंकजा मुंडे-धनंजय मुंडे (परळी)

> अमित देशमुख (लातूर)
> राजेश टाेपे (घनसावंगी)

> अर्जुन खाेतकर (जालना)

> राणा जगजितसिंह (उस्मानाबाद)

विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील माहितीसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

उत्तर महाराष्ट्र : विखे व गावितांचा काँग्रेसला, पिचडांचा राष्ट्रवादीला धक्का नाशिक/जळगाव - विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्यापूर्वीच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेस वा राष्ट्रवादीची पिढ्यान्पिढ्या पाठराखण करणारी अनेक घराणी आता शिवसेना किंवा भाजपच्या गाेटात सामील झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने वातावरण ढवळून निघाले हाेते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दाेन्ही कार्यक्रमांना भुजबळ गैरहजर राहिल्याने तर या चर्चेला पेव फुटले हाेते. मात्र स्वत: भुजबळ व पवारांनी या पक्षांतराच्या वावड्या असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. असे असले तरी भुजबळांच्या उमेदवारीला आता पक्षातूनच माेठा विराेध सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यातील मधुकर पिचड, वैभव पिचड (राष्ट्रवादी), राधाकृष्ण विखे पाटील, भाऊसाहेब कांबळे व नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या निर्मला गावित (काँग्रेस) यांच्या पक्षांतरामुळे मात्र दाेन्ही काँग्रेसला माेठा झटका बसला. या सर्व नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधारी भाजप- शिवसेनेची वाट धरली. नगर जिल्ह्यात तर विखे नावाचाच एक राजकीय बलाढ्य पक्ष समजला जाताे. त्यांचे पुत्र सुजय यांनी लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर भाजपत जाऊन खासदारकी पटकावली. पाठाेपाठ वडील राधाकृष्ण विखे पाटलांनीही भाजपत जाऊन कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेतले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नगर, शिर्डी, श्रीरामपूरसह नगर जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विखेंच्या पक्षांतरानंतर काँग्रेसने त्यांचेच पक्षांतर्गत विराेधक बाळासाहेब थाेरात यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली. त्यामुळे आता थाेरातांना राज्याबराेबरच स्वत:च्या नगर जिल्ह्यातही पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. मनसेचा जाेर कमी झाल्यामुळे व अनेक कार्यकर्ते गळाला लागल्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकदही वाढली आहे. जळगावात गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांचे चांगले वर्चस्व असल्यामुळे भाजप निश्चिंत आहे. नंदुरबारमधील काँग्रेसकडून आठ वेळा खासदार झालेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नवापुरात ते काँग्रेसचे शिरीष नाईक यांना आव्हान देऊ शकतात. विशेष म्हणजे इगतपुरीतील पक्षांतर केलेल्या निर्मला गावित याही माणिकरावांच्याच कन्या आहेत. चर्चेतील नेते : > छगन भुजबळ (येवला) > राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) > राम शिंदे (कर्जत-जामखेड) > गिरीश महाजन (जामनेर) > एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) > बाळासाहेब थाेरात (संगमनेर)विदर्भ : भाजपच्या किल्ल्यात पक्षांतर नाही, पण नाराजीचे वारे जाेमात नागपूर - एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ २०१४ पासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांत भाजपचा मजबूत बालेकिल्ला बनला आहे. विधानसभेच्या एकूण ६२ जागांपैकी ४४ जागा एकट्या भाजपने गेल्या निवडणुकीत इथे पटकावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे दिग्गज नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भक्कम नेटवर्कवर भाजपचे या भागात चांगले नेटवर्क तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत या भागात विराेधी पक्ष फक्त आैषधालाच उरल्यात जमा आहे. म्हणूनच राज्यातील इतर विभागांत माेठ्या प्रमाणावर पक्षांतर हाेत असताना विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही बडा नेता अद्याप भाजपमध्ये गेला नसल्याचे दिसते. लाेकसभा निवडणुकीपूर्वी भंंडाऱ्यातील खासदार नाना पटाेले व काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपला रामराम ठाेकला हाेता. हा अपवाद वगळता भाजप-शिवसेनेतही पक्षांतर झाले नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची मर्जी राखण्याबराेबरच इच्छुकांची समजूत कशी काढायची, असा प्रश्न भाजपपुढे उभा राहणार आहे. एकूणच, भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मात्र या पक्षाला नाराजीचा सामना करावा लागू शकताे. काँग्रेसची धुरा विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, भाजपतून आलेले माजी खासदार नाना पटाेले व शिवसेनेतून आलेले चंद्रपूरचे खासदार बाळू धानाेरकर यांच्यावर असेल. राष्ट्रवादीला विदर्भात फारसा जनाधार नाही. वाशिम जिल्ह्यात मनाेहर नाईक व अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचाच काय ताे आधार म्हणावा लागेल. शिवसेनेचाही फक्त पश्चिम विदर्भात निभाव लागण्याची चिन्हे आहेत. चर्चेतील नेते : > देवेंद्र फडणवीस (नागपूर) > सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) > चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) > अनिल बोंडे (माेर्शी) > संजय राठाेड (दिग्रस) > विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी) > अनिल देशमुख (काटाेल).पश्चिम महाराष्ट्र : दाेन्ही काँग्रेस काेमात, नवे उमेदवार शाेधण्याची वेळ पुणे/ साेलापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्षांतराचा सर्वात माेठा धक्का बसला ताे पश्चिम महाराष्ट्रात. सहकारी साखर कारखानदारीचा पट्टा व अन्य सहकारी संस्थांचे घट्ट जाळे असलेल्या या भागात गेल्या ६० वर्षांपासून राष्ट्रवादी व आणि काँग्रेसची पकड होती. २०१४ च्या निवडणुकांपासून दाेन्ही काँग्रेसमधील बडे मासे भाजपने गळाला लावले आणि शिरकाव केला. काहींना पदांचे आमिष, तर काहींच्या मागे सहकारी संस्थांतील कारभारा;च्या चाैकशीचा भुंगा लावून भाजपने त्यांना पक्षांतर करणे भाग पाडले. दाेन्ही पक्षातील अंतर्गत विराेधही सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडला. साताऱ्याचे उदयनराजे भाेसले तर सहाच महिन्यांत खासदारकी साेडून भाजपत गेले. त्यांचे बंधू शिवेंद्रसिंह, बार्शीचे दिलीप साेपल, माण- खटावचे जयकुमार गाेेरे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, काेल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, साेलापूरचे रणजितसिंह माेहिते, दिलीप माने, रश्मी बागल असे अनेक दिग्गज भाजप-सेनेने खेचून घेतले. त्यामुळे दाेन्ही काँग्रेसला जबर धक्का बसला. यातून सावरण्यापूर्वीच त्यांच्यासमाेर निवडणुकांची परीक्षा असेल. आज परिस्थिती अशी आहे की, कालपर्यंत एकाच पक्षाच राहूनही एकमेकांचे कधी ताेंडही न पाहणारे काही नेते आता भाजपच्या छत्राखाली येऊन एकमेकांना सहकार्याची भाषा करू लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जादूची कांडी; फिरवून व सत्तेची लालूच दाखवून हा चमत्कार घडवून आणला. त्यामुळे ७८ वर्षीय शरद पवार यांना या वयात स्वत: फिरून पुन्हा एकदा तरुणांची नवी फळी तयार करण्यासाठी शर्थ करावी लागत आहे. जे दिग्गज पक्ष साेडून गेले त्यांच्या जागी नवे उमेदवार शाेधण्याचेही आव्हान दाेन्ही काँग्रेसच्या नेत्यांसमाेर आहे. मनसेचा एकमेव आमदार शरद साेनवणेंना शिवसेनेने लाेकसभेच्या वेळीच शिवबंधन बांधून आपलेसे केले हाेते. चर्चेतील नेते : > अजित पवार (बारामती) > हर्षवर्धन पाटील (इंदापूर) > दिलीप वळसे (आंबेगाव) > पृथ्वीराज चव्हाण (कराड) > जयंत पाटील (इस्लामपूर) >सुभाष देशमुख ( द. सोलापूर) > विश्वजित कदम (पलूस)मुंबई-ठाणे : राष्ट्रवादीला खिंडार, मनसे अस्तित्वहीन; युती निश्चिंत मुंबई - शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या मुंबई व ठाण्यातही आता भाजपने चांगलेच हातपाय पसरले आहेत. या भागात राष्ट्रवादीचे पूर्वीपासूनचे फारसे प्राबल्य नव्हते मात्र भाजपच्या मुसंडीने काँग्रेसच्या वर्चस्वाला माेठा हादरा बसला आहे. इतिहासात प्रथमच स्वबळावर लढूनही भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या भागात सर्वाधिक आमदार निवडून आणले आणि शिवसेनेलाही आव्हान दिले. नंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपने शिवसेनेला ताकद दाखवून दिली. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत युतीने लढत शिवसेना-भाजपने मुंबई-ठाण्यातील सर्व जागा पटकावल्या. विधानसभा निवडणुकीसाठी या भागातीलही अनेक दिग्गज नेते भाजपने व शिवसेनेने गळाला लावले. राष्ट्रवादीचे गणेश नाईक, संदीप नाईक, सचिन अहिर, पांडुरंग वराेरा, तर काँग्रेसचे कृपाशंकर सिंह, कालिदास काेळंबकर या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्याबराेबरच नवी मुंबईतील त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही कमळ; हाती धरल्यामुळे महापालिकेवर आयताच भाजपचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्यासारखा बडा नेता गळाला लावून सेनेनेही आदित्य ठाकरे वरळीतून लढल्यास विजयाचा मार्ग आधीच निर्धाेक करून टाकला आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा शिवसेनेला माेठा फटका बसला हाेता. मात्र गेल्या पाच वर्षांत गलितगात्र झालेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शिवसेनेने आपल्या तंबूत आणले आहे. अगदी मुंबई मनपातील मनसेचे नगरसेवकही फाेडून काठावर बहुमत असलेली शिवसेना मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेसमाेर मुंबई, ठाण्यात विराेधकांचे फारसे आव्हान असणार नाही. चर्चेतील नेते : > विनाेद तावडे (बाेरिवली) > आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) > गणेश नाईक (बेलापूर) > प्रकाश मेहता (घाटकाेपर पूर्व) > मंगलप्रसाद लाेढा (मलबार हिल) > एकनाथ शिंदे (काेपरी- पाचपाखडी).कोकण : जाधव, अवधूत तटकरेंमुळे सेना भक्कम; राणे हाेल्ड;वर रत्नागिरी/ रायगड - रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या काेकणातील तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे वर्चस्व आहे. मध्यंतरी नारायण राणे यांनी शिवसेना साेडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पक्षाला काहीशी स्पेस मिळू शकली. मात्र आघाडीचे सरकार पायउतार हाेताच राणेंनी बंडाचा पवित्रा घेत भाजपशी जवळीक वाढवली. भाजपनेही त्यांना खासदारकी दिली, मात्र पक्षात थेट प्रवेश दिला नाही. त्यामुळे २०१४ च्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा या भागात कायम राहिला. भाजपला या भागात कधीच पाय राेवता आले नाहीत. रायगड जिल्ह्यात शेकापच्या मदतीने राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात काहीसे यश मिळवले. लाेकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा पराभव केला. हा धक्का जिव्हारी लागल्याने शिवसेनेने तटकरे कुटुंबातील अंतर्गत वाद हेरून सुनील यांचे पुतणे आमदार अवधूत, बंधू माजी आमदार अनिल यांना शिवसेनेत घेऊन तटकरेंना व राष्ट्रवादीला माेठा हादरा दिला. आता अवधूत यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देऊन थेट सुनील तटकरे यांनाच हादरा देण्याच्या तयारीत शिवसेना आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनीही शिवबंधन बांधून घेतल्याने हा मतदारसंघ आपलाच झाल्याच्या आविर्भावात शिवसेना आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे दुकान चालवून पाहिले, मात्र त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळे आपल्या व मुलांच्या भवितव्यासाठी पक्षच भाजपत विलीन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. असे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला काहीसे यश मिळण्याच्या आशा आहेत. मात्र शिवसेनेचा राणेंच्या भाजप प्रवेशाला तीव्र विराेध आहे. तसे झाल्यास युती ताेडण्यापर्यंतचा टाेकाचा निर्णय शिवसेना घेऊ शकते. म्हणूनच भाजपने हा निर्णय हाेल्ड;वर ठेवला आहे. चर्चेतील नेते : > नितेश राणे (कणकवली) > भास्कर जाधव (गुहागर) > अवधूत तटकरे, अदिती तटकरे (श्रीवर्धन) > दीपक केसरकर (सावंतवाडी) > उदय सामंत (रत्नागिरी) > सुभाष पाटील (अलिबाग)

उत्तर महाराष्ट्र : विखे व गावितांचा काँग्रेसला, पिचडांचा राष्ट्रवादीला धक्का नाशिक/जळगाव - विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्यापूर्वीच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेस वा राष्ट्रवादीची पिढ्यान्पिढ्या पाठराखण करणारी अनेक घराणी आता शिवसेना किंवा भाजपच्या गाेटात सामील झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेने वातावरण ढवळून निघाले हाेते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दाेन्ही कार्यक्रमांना भुजबळ गैरहजर राहिल्याने तर या चर्चेला पेव फुटले हाेते. मात्र स्वत: भुजबळ व पवारांनी या पक्षांतराच्या वावड्या असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. असे असले तरी भुजबळांच्या उमेदवारीला आता पक्षातूनच माेठा विराेध सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यातील मधुकर पिचड, वैभव पिचड (राष्ट्रवादी), राधाकृष्ण विखे पाटील, भाऊसाहेब कांबळे व नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या निर्मला गावित (काँग्रेस) यांच्या पक्षांतरामुळे मात्र दाेन्ही काँग्रेसला माेठा झटका बसला. या सर्व नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधारी भाजप- शिवसेनेची वाट धरली. नगर जिल्ह्यात तर विखे नावाचाच एक राजकीय बलाढ्य पक्ष समजला जाताे. त्यांचे पुत्र सुजय यांनी लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर भाजपत जाऊन खासदारकी पटकावली. पाठाेपाठ वडील राधाकृष्ण विखे पाटलांनीही भाजपत जाऊन कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेतले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नगर, शिर्डी, श्रीरामपूरसह नगर जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विखेंच्या पक्षांतरानंतर काँग्रेसने त्यांचेच पक्षांतर्गत विराेधक बाळासाहेब थाेरात यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली. त्यामुळे आता थाेरातांना राज्याबराेबरच स्वत:च्या नगर जिल्ह्यातही पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. मनसेचा जाेर कमी झाल्यामुळे व अनेक कार्यकर्ते गळाला लागल्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकदही वाढली आहे. जळगावात गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांचे चांगले वर्चस्व असल्यामुळे भाजप निश्चिंत आहे. नंदुरबारमधील काँग्रेसकडून आठ वेळा खासदार झालेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नवापुरात ते काँग्रेसचे शिरीष नाईक यांना आव्हान देऊ शकतात. विशेष म्हणजे इगतपुरीतील पक्षांतर केलेल्या निर्मला गावित याही माणिकरावांच्याच कन्या आहेत. चर्चेतील नेते : > छगन भुजबळ (येवला) > राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) > राम शिंदे (कर्जत-जामखेड) > गिरीश महाजन (जामनेर) > एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) > बाळासाहेब थाेरात (संगमनेर)

विदर्भ : भाजपच्या किल्ल्यात पक्षांतर नाही, पण नाराजीचे वारे जाेमात नागपूर - एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ २०१४ पासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांत भाजपचा मजबूत बालेकिल्ला बनला आहे. विधानसभेच्या एकूण ६२ जागांपैकी ४४ जागा एकट्या भाजपने गेल्या निवडणुकीत इथे पटकावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे दिग्गज नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भक्कम नेटवर्कवर भाजपचे या भागात चांगले नेटवर्क तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत या भागात विराेधी पक्ष फक्त आैषधालाच उरल्यात जमा आहे. म्हणूनच राज्यातील इतर विभागांत माेठ्या प्रमाणावर पक्षांतर हाेत असताना विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही बडा नेता अद्याप भाजपमध्ये गेला नसल्याचे दिसते. लाेकसभा निवडणुकीपूर्वी भंंडाऱ्यातील खासदार नाना पटाेले व काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपला रामराम ठाेकला हाेता. हा अपवाद वगळता भाजप-शिवसेनेतही पक्षांतर झाले नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची मर्जी राखण्याबराेबरच इच्छुकांची समजूत कशी काढायची, असा प्रश्न भाजपपुढे उभा राहणार आहे. एकूणच, भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मात्र या पक्षाला नाराजीचा सामना करावा लागू शकताे. काँग्रेसची धुरा विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, भाजपतून आलेले माजी खासदार नाना पटाेले व शिवसेनेतून आलेले चंद्रपूरचे खासदार बाळू धानाेरकर यांच्यावर असेल. राष्ट्रवादीला विदर्भात फारसा जनाधार नाही. वाशिम जिल्ह्यात मनाेहर नाईक व अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचाच काय ताे आधार म्हणावा लागेल. शिवसेनेचाही फक्त पश्चिम विदर्भात निभाव लागण्याची चिन्हे आहेत. चर्चेतील नेते : > देवेंद्र फडणवीस (नागपूर) > सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) > चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) > अनिल बोंडे (माेर्शी) > संजय राठाेड (दिग्रस) > विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी) > अनिल देशमुख (काटाेल).

पश्चिम महाराष्ट्र : दाेन्ही काँग्रेस काेमात, नवे उमेदवार शाेधण्याची वेळ पुणे/ साेलापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्षांतराचा सर्वात माेठा धक्का बसला ताे पश्चिम महाराष्ट्रात. सहकारी साखर कारखानदारीचा पट्टा व अन्य सहकारी संस्थांचे घट्ट जाळे असलेल्या या भागात गेल्या ६० वर्षांपासून राष्ट्रवादी व आणि काँग्रेसची पकड होती. २०१४ च्या निवडणुकांपासून दाेन्ही काँग्रेसमधील बडे मासे भाजपने गळाला लावले आणि शिरकाव केला. काहींना पदांचे आमिष, तर काहींच्या मागे सहकारी संस्थांतील कारभारा;च्या चाैकशीचा भुंगा लावून भाजपने त्यांना पक्षांतर करणे भाग पाडले. दाेन्ही पक्षातील अंतर्गत विराेधही सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडला. साताऱ्याचे उदयनराजे भाेसले तर सहाच महिन्यांत खासदारकी साेडून भाजपत गेले. त्यांचे बंधू शिवेंद्रसिंह, बार्शीचे दिलीप साेपल, माण- खटावचे जयकुमार गाेेरे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, काेल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, साेलापूरचे रणजितसिंह माेहिते, दिलीप माने, रश्मी बागल असे अनेक दिग्गज भाजप-सेनेने खेचून घेतले. त्यामुळे दाेन्ही काँग्रेसला जबर धक्का बसला. यातून सावरण्यापूर्वीच त्यांच्यासमाेर निवडणुकांची परीक्षा असेल. आज परिस्थिती अशी आहे की, कालपर्यंत एकाच पक्षाच राहूनही एकमेकांचे कधी ताेंडही न पाहणारे काही नेते आता भाजपच्या छत्राखाली येऊन एकमेकांना सहकार्याची भाषा करू लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जादूची कांडी; फिरवून व सत्तेची लालूच दाखवून हा चमत्कार घडवून आणला. त्यामुळे ७८ वर्षीय शरद पवार यांना या वयात स्वत: फिरून पुन्हा एकदा तरुणांची नवी फळी तयार करण्यासाठी शर्थ करावी लागत आहे. जे दिग्गज पक्ष साेडून गेले त्यांच्या जागी नवे उमेदवार शाेधण्याचेही आव्हान दाेन्ही काँग्रेसच्या नेत्यांसमाेर आहे. मनसेचा एकमेव आमदार शरद साेनवणेंना शिवसेनेने लाेकसभेच्या वेळीच शिवबंधन बांधून आपलेसे केले हाेते. चर्चेतील नेते : > अजित पवार (बारामती) > हर्षवर्धन पाटील (इंदापूर) > दिलीप वळसे (आंबेगाव) > पृथ्वीराज चव्हाण (कराड) > जयंत पाटील (इस्लामपूर) >सुभाष देशमुख ( द. सोलापूर) > विश्वजित कदम (पलूस)

मुंबई-ठाणे : राष्ट्रवादीला खिंडार, मनसे अस्तित्वहीन; युती निश्चिंत मुंबई - शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या मुंबई व ठाण्यातही आता भाजपने चांगलेच हातपाय पसरले आहेत. या भागात राष्ट्रवादीचे पूर्वीपासूनचे फारसे प्राबल्य नव्हते मात्र भाजपच्या मुसंडीने काँग्रेसच्या वर्चस्वाला माेठा हादरा बसला आहे. इतिहासात प्रथमच स्वबळावर लढूनही भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या भागात सर्वाधिक आमदार निवडून आणले आणि शिवसेनेलाही आव्हान दिले. नंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपने शिवसेनेला ताकद दाखवून दिली. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत युतीने लढत शिवसेना-भाजपने मुंबई-ठाण्यातील सर्व जागा पटकावल्या. विधानसभा निवडणुकीसाठी या भागातीलही अनेक दिग्गज नेते भाजपने व शिवसेनेने गळाला लावले. राष्ट्रवादीचे गणेश नाईक, संदीप नाईक, सचिन अहिर, पांडुरंग वराेरा, तर काँग्रेसचे कृपाशंकर सिंह, कालिदास काेळंबकर या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्याबराेबरच नवी मुंबईतील त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही कमळ; हाती धरल्यामुळे महापालिकेवर आयताच भाजपचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्यासारखा बडा नेता गळाला लावून सेनेनेही आदित्य ठाकरे वरळीतून लढल्यास विजयाचा मार्ग आधीच निर्धाेक करून टाकला आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा शिवसेनेला माेठा फटका बसला हाेता. मात्र गेल्या पाच वर्षांत गलितगात्र झालेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शिवसेनेने आपल्या तंबूत आणले आहे. अगदी मुंबई मनपातील मनसेचे नगरसेवकही फाेडून काठावर बहुमत असलेली शिवसेना मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेसमाेर मुंबई, ठाण्यात विराेधकांचे फारसे आव्हान असणार नाही. चर्चेतील नेते : > विनाेद तावडे (बाेरिवली) > आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) > गणेश नाईक (बेलापूर) > प्रकाश मेहता (घाटकाेपर पूर्व) > मंगलप्रसाद लाेढा (मलबार हिल) > एकनाथ शिंदे (काेपरी- पाचपाखडी).

कोकण : जाधव, अवधूत तटकरेंमुळे सेना भक्कम; राणे हाेल्ड;वर रत्नागिरी/ रायगड - रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या काेकणातील तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे वर्चस्व आहे. मध्यंतरी नारायण राणे यांनी शिवसेना साेडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पक्षाला काहीशी स्पेस मिळू शकली. मात्र आघाडीचे सरकार पायउतार हाेताच राणेंनी बंडाचा पवित्रा घेत भाजपशी जवळीक वाढवली. भाजपनेही त्यांना खासदारकी दिली, मात्र पक्षात थेट प्रवेश दिला नाही. त्यामुळे २०१४ च्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा या भागात कायम राहिला. भाजपला या भागात कधीच पाय राेवता आले नाहीत. रायगड जिल्ह्यात शेकापच्या मदतीने राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात काहीसे यश मिळवले. लाेकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा पराभव केला. हा धक्का जिव्हारी लागल्याने शिवसेनेने तटकरे कुटुंबातील अंतर्गत वाद हेरून सुनील यांचे पुतणे आमदार अवधूत, बंधू माजी आमदार अनिल यांना शिवसेनेत घेऊन तटकरेंना व राष्ट्रवादीला माेठा हादरा दिला. आता अवधूत यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देऊन थेट सुनील तटकरे यांनाच हादरा देण्याच्या तयारीत शिवसेना आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनीही शिवबंधन बांधून घेतल्याने हा मतदारसंघ आपलाच झाल्याच्या आविर्भावात शिवसेना आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे दुकान चालवून पाहिले, मात्र त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळे आपल्या व मुलांच्या भवितव्यासाठी पक्षच भाजपत विलीन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. असे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला काहीसे यश मिळण्याच्या आशा आहेत. मात्र शिवसेनेचा राणेंच्या भाजप प्रवेशाला तीव्र विराेध आहे. तसे झाल्यास युती ताेडण्यापर्यंतचा टाेकाचा निर्णय शिवसेना घेऊ शकते. म्हणूनच भाजपने हा निर्णय हाेल्ड;वर ठेवला आहे. चर्चेतील नेते : > नितेश राणे (कणकवली) > भास्कर जाधव (गुहागर) > अवधूत तटकरे, अदिती तटकरे (श्रीवर्धन) > दीपक केसरकर (सावंतवाडी) > उदय सामंत (रत्नागिरी) > सुभाष पाटील (अलिबाग)
X
COMMENT