आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ आजरपणामुळेच झोप उडते असे नाही, या 4 कारणांमुळेही लागत नाही झोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतामध्ये विदुर यांच्या विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयुक्त होत्या असे नाही, आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचे पालन केल्यास मनुष्याला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. विदुराने अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे रात्रीची झोप आणि शांती भंग होऊ शकते.

अभियुक्तं बलवता दुर्बलं हीनसाधनम्।

ह्रतस्वं कामिनं चोरमाविशन्ति प्रजागराः।।


- जीवन जगताना महत्वाच्या सुख-सुविधा, साधन यांची कमतरता निर्माण झाल्यास मनुष्य रात्री शांत झोपू शकत नाही. यासाठी मनुष्याने धैर्यवान आणि आशावादी बनावे.

- काम भावना म्हणजे काम वासनेने पिडीत व्यक्ती रात्री शांत झोपू शकत नाही. यापासून दूर राहण्यासाठी जीवनात संयम ठेवावा आणि झोपण्यापूर्वी चांगले विचार आणि देव स्मरण करावे.

- चोरी करणारा. चोरीचा दुसरा अर्थ म्हणजे आळस आणि कर्महीनता असा आहे. कामचुकारपणा करणारा व्यक्ती रात्री शांत झोपू शकत नाही. यामुळे आळस, लालसा आणि अधर्मापासून दूर राहावे.

- स्वतःपेक्षा जास्त बलशाली आणि वरचढ व्यक्तीशी वाद, मतभेद झाल्यास मन-मस्तिष्क रात्री अशांत राहते. यापासून दूर राहण्यासाठी प्रेम, विश्वास आणि सहयोगाच्या मार्गाचा अवलंब करावा.