आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत / कष्ट आणि मेहनतीने मिळालेल्या संपत्तीने घरात येते सुख-समृद्धी, दूर होतात अडचणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क - महाभारतातील धृतराष्ट्र आणि विदुराच्या काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये विदूराने ज्या गोष्टी धृतराष्ट्राला सांगितल्या होत्या त्यांना विदूर निती असे म्हटले जाते. त्यामुळे विदुर-नीतिमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करून आपण अनेक अडचणीपासून स्वतःचे रक्षण करू शकतो. महाभारताच्या उद्योगपर्वाच्या 35 व्या अध्यायातील 44 व्या श्लोकामध्ये सांगितले आहे की, आपण पैशांच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे...


श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात्तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठत्ति।।


धनासंबंधीची विदुर-नीति
वरील श्लोकानुसार, चांगले कर्म केल्याने लक्ष्मी आपल्या घरी येते. कष्ट आणि प्रामाणिक कामातून मिळणाऱ्या धनातून घरात सदैव सुख-समृद्धी राहते. तसेच, वाईट काम करणाऱ्या लोकांना काही काळासाठी सुख प्राप्त होते पण ते कधीच आनंदी राहू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, महाभारतात दुर्योधनाने फसवणूक करून पांडवांची सर्व धन-संपत्ती लुटली, पण त्याच्या जवळ जास्त काळ ती टिकू शकली नाही. दुर्योधनाने संपत्तीच्या लालचीमुळे अधर्म करत राहिला आणि शेवटी त्याच्या संपुर्ण वंशाचा नाश झाला. 


त्यामुळे आपण पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे. जर आपला पैसा चांगल्या कामामध्ये गुंतवला तर उत्तम लाभ मिळू शकतो. तसेच जे लोक लवकर संपत्ती कमवण्याच्या नादात चुकीच्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात, शेवटी त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. महाभारतातसुद्धा दुर्योधनाने धनाचा उपयोग पांडवांना नष्ट करण्यासाठी केला होता, पण त्याच्या पदरी फक्त निराशाच पडली.


त्यामुळे आयुष्यात सुखी राहण्यासाठी भविष्यासाठी चांगल्या योजना तयार करा, म्हणजे कोठे पैसे खर्च करायचे, कुठे नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवावा. लक्षात ठेवा महाभारतात पांडव दुर्योधनाविरूद्ध पराभव झाल्यानंतर ते कमी आयुष्य जगले पण ते एकटेपणातही सुखी आणि आनंदी राहिले.

 

व्यक्तीने धनासंबंधीच्या कामामध्ये धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे. जर आपल्याला सदैव सुख आणि शांती प्राप्त करायची असेल तर मानसिक, शारिरीक आणि वैचारिक संयम राखणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या संपत्तीचा कधीही गैरवापर करू नका. तसेच, युधिष्ठिरही आपली वाईट सवय द्युत क्रीडा खेळण्यामुळे सर्व काही गमावून बसला. त्याच्या या एका चुकीमुळे पांडवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...