धनाशी संबंधित या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यास विविध दुःखापासून दूर राहू शकता

महाभारतानुसार चांगल्या कर्मामुळे मिळते स्थायी लक्ष्मी, चुकीच्या कामातून मिळवलेले धन आजार आणि अडचणी घेऊन येते...

रिलिजन डेस्क

Mar 31,2019 12:01:00 AM IST

महाभारतामध्ये धृतराष्ट्र आणि विदुर यांच्यातील अनेक संवाद आहेत. या संवादांमध्ये विदुर यांनी अनेक अशा नीती सांगितल्या आहेत ज्यामुळे आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. काही नीती धनाशी संबंधित आहेत. अशाच एका नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की...


विदुर नीतीनुसार
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात्तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठत्ति।।


या श्लोकामध्ये धन कमावण्याचे आणि बचतीचे चार सूत्र सांगण्यात आले आहेत.


पहिले सूत्र - चांगल्या कर्माने लक्ष्मी प्राप्त होते. व्यावहारिक दृष्टीकोनातून कष्टाने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे धनाची आवक होते.


दुसरे सूत्र - प्रगल्भता सोप्या शब्दात याचा अर्थ आहे, की धनाचे प्रबंधन म्हणजे बचत केल्यानेच धन वाढत राहते.


तिसरे सूत्र - चतुराईने म्हणजे धनाचा योग्य आणि चांगल्या कामासाठी उपयोग, उत्पन्न-खर्चाकडे लक्ष देणे यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक संतुलन राहते.


चौथे आणि महत्त्वाचे सूत्र संयम म्हणजे मानसिक, शारीरिक आणि वैचारिक संयम धारण केल्याने धनाची रक्षा होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सुख प्राप्त करण्यासाठी हौस पूर्ण करण्याच्या इच्छेमध्ये धनाचा दुरुपयोग करू नये.

X